Hariyali Laadoo – Bathua Laadoo (हरियाली लाडू – चंदन बटवा / बथुआ लाडू) – Laddus using Chenopodium Album

Chandan Batwa Laadoo - Bathua Laddu
Hariyali Laadoo – Bathua Laadoo (हरियाली लाडू - चंदन बटवा / बथुआ लाडू)

Hariyali Laadoo – Bathua Laadoo (हरियाली लाडू चंदन बटवा / बथुआ लाडू) – Laddus using Chenopodium Album – My Innovative Recipe

हरियाली लाडू चंदन बटवा / बथुआ लाडू मराठी

My Innovative recipe using Bathua (Chandan Batwa) for making Laddus. Chandan Batwa is packed with nutrients. It makes nice Green Delicious and healthy Laddus. I add some Wheat Flour to these Laddus and crushed roasted sesame seeds for taste. These Laddus do not have white sugar. Instead Jaggery is added for sweetness. Little salt is required for taste. These Laddus use less Ghee than other Laddus.

Ingredients (1 cup = 250ml) (makes 7-8 Laadoo)

Chandan Batwa / Bathua – Chenopodium Album (चंदन बटव्याची पानं)

Chandan Batwa (Bathua) Leaves 1.5 cup

Wheat Flour ½ cup

Jaggery crushed ½ cup

Roasted Sesame Seeds coarse Powder 1 tablespoon

Pure Ghee 5 teaspoon

Salt a pinch

Cashew / dry fruits

Instructions

1. Clean Chandan Batwa. Separate out leaves and tender stems. Throw away the remaining parts. Wash Chandan Batwa Leaves and tender stems. Spread them on a napkin to dry.

2. In a pan, add 2 teaspoon of Ghee. Add Chandan Batwa Leaves, stems and roast on low flame till crispy. Keep stirring all the time.

3. Take it out in a plate.

4. In the same pan, add Wheat flour and 3 teaspoon of Ghee. Roast on low flame stirring continuously till the colour changes and you get nice aroma of roasted flour.

Ingredients – Roasted Bathua leaves, Roasted Wheat Flour, Crushed roasted sesame seeds (साहित्य – भाजलेली चंदन बटव्याची पानं, भाजलेली कणिक आणि भाजलेल्या तिळाचं कूट)

5. Take it out in a bowl.

6. Using a grinder, grind roasted Chandan Batwa into a coarse powder.

7. Add Jaggery in the grinder and grind together into a fine powder.

8. Transfer this powder to the bowl. Add sesame Seeds Powder. Mix well.

9. Roll medium size Laddus.

10. Delicious Hariyali Laddus are ready. These can be stored at room temperature for 2-3 days.

Chandan Batwa Laadoo - Bathua Laddu
Hariyali Laadoo – Bathua Laadoo (हरियाली लाडू – चंदन बटवा / बथुआ लाडू)
Chandan Batwa Laadoo - Bathua Laddu
Hariyali Laadoo – Bathua Laadoo (हरियाली लाडू – चंदन बटवा / बथुआ लाडू)

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

हरियाली लाडू चंदन बटवा / बथुआ लाडू माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी

गूगल सर्च वर एका ठिकाणी बथुवा/ बथुआ / चंदन बटवा/ Chenopodium Album म्हणजे चाकवत असं दिलं आहे. ते चुकीचं आहे. चाकवताची भाजी वेगळी असते. बथुवा म्हणजे चंदन बटवा. ही भाजी फक्त हिवाळ्यात मिळते. उत्तर भारतात ही भाजी सरसों का सागमध्ये घालतात. मी ह्या भाजीचं धिरडं, आमटी करते. सोबत त्या भाजीचा फोटोही दिला आहे म्हणजे भाजी ओळखायला सोपं पडेल.

आपण सहसा पालेभाज्या वापरून लाडू करत नाही. पण ह्या लाडवात मी चंदन बटवा (बथुआ) वापरलाय. चंदन बटवा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असतो. ह्या लाडवांत मी थोडी कणिक भाजून घालते, १ चमचा तीळ घालते आणि   गोडव्यासाठी गूळ घालते. ह्या लाडवांना तूप अगदी कमी लागतं. चंदन बटव्यामुळे लाडवाना छान हिरवा रंग येतो – म्हणून हे हरियाली लाडू !! आणि चवही छान येते. किंचित मीठ घालावं लागतं यात.

मुलं पालेभाज्या खायला नाखूष असतात. त्यांना हे लाडू करून दिले तर आवडीने खातील

साहित्य (१ कप = २५० मिली) (८ लाडवांसाठी)

Chandan Batwa / Bathua – Chenopodium Album (चंदन बटव्याची पानं)

चंदन बटव्याची (बथुआ / बथुवा) पानं दीड  कप

कणिक अर्धा कप

चिरलेला गूळ अर्धा कप

भाजलेल्या तिळाची जाडसर पूड १ टेबलस्पून

साजूक तूप ५ टीस्पून

मीठ चिमूटभर

काजू / सुका मेवा आवडीप्रमाणे

कृती

. चंदन बटव्याची पानं आणि कोवळे देठ काढून घ्या. स्वच्छ धुवून नॅपकिनवर पसरून सुकवून घ्या.

. एका कढईत २ टीस्पून तूप घालून चंदन बटवा मंद आचेवर पानं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

. एका ताटलीत काढून गार करा.

. त्याच कढईत ३ टीस्पून साजूक तूप आणि कणिक घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्या. एका परातीत काढून घ्या.

Ingredients – Roasted Bathua leaves, Roasted Wheat Flour, Crushed roasted sesame seeds (साहित्य – भाजलेली चंदन बटव्याची पानं, भाजलेली कणिक आणि भाजलेल्या तिळाचं कूट)

. भाजलेला चंदन बटवा मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. त्यातच गूळ घालून बारीक करून घ्या.

. मिश्रण परातीत काढून घ्या. तिळाची पूड घालामीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करासुका मेवा घाला.

. मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या.

. खमंग आणि पौष्टिक हरियाली लाडू तयार आहेत.

. हे लाडू फ्रिजमध्ये न ठेवता २३ दिवस टिकतात

Chandan Batwa Laadoo - Bathua Laddu
Hariyali Laadoo – Bathua Laadoo (हरियाली लाडू – चंदन बटवा / बथुआ लाडू)
Chandan Batwa Laadoo - Bathua Laddu
Hariyali Laadoo – Bathua Laadoo (हरियाली लाडू – चंदन बटवा / बथुआ लाडू)

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes