Kale Gore Til Laadoo (काळे गोरे तिळाचे लाडू) – White and Black Sesame Seeds Laddu
Generally we make Til Laddus with White Sesame Seeds. This time I mixed White and Black sesame seeds and made laddus. These laddus are more tasty than the ones with white sesame seeds.
This is a recipe of Soft (खुसखुशीत) Til Laadoos that anyone can eat without a nut cracker. These laddus are made for Makar Sankranti (Kite Festival). Since Chikki Jaggary (Gul) is not used in this, Laddus are soft (Khuskhushit in Marathi). Anyone can eat them easily.
Ingredients
White Sesame Seeds (Unpolished) ½ Kg
Black Sesame Seeds (Unpolished) ½ Kg
Groundnuts ¼ kg
Dry Coconut (kopra) ¼ kg
Jaggery (Non chikki – non sticky) 1.25 – 1.5 kg (apprx)
Cardamom powder ½ teaspoon
Ghee (Clarified Butter) 1 Tablespoon
Instructions
1. Dry Roast white sesame seeds separately on medium heat till light brown and keep aside.
2. Dry Roast black sesame seeds separately on medium heat till they splutter and keep aside.
3. Roast Groundnuts separately. Grate dry coconut and roast on medium heat till light brown.
4. Transfer roasted white sesame seeds to a grinder and pulse grind for 2 seconds; seeds should just break; Do not make a powder. Do not grind Black sesame seeds.
5. Grind roasted groundnuts into a coarse powder.
6. Crush roasted dry coconut by hand.
7. Mix all the above ingredients and add cardamom powder.
8. Take about 300 gms of Jaggery in a thick bottom pan, add ¼ spoon of ghee; heat the pan on medium heat till Jaggery melts and starts boiling (you see bubbles); keep stirring all the time
9. Take the pan off the heat; add mixture in Jaggery syrup a serving spoonful at a time and stir it well; about ¼ of the mixture will be added to the syrup; mixture should be thick
10. While mixture is hot, roll small size laddu. Apply little ghee to your palms so that mixture won’t stick. You will have to quickly roll the laddus. If the mixture cools, you will not be able to roll it. You will have to reheat the mixer again and try rolling laddus. That’s why you need to make the syrup in small quantity.
11. Repeat steps 9 and 10 till you use all the mixture.
Note
1. For making soft Laddus, one should know how to make right consistency Jaggery Syrup. For these laddus, heat crushed Jaggery with little Ghee till Jaggery melts. Keep stirring all the time. When you start seeing bubbles in the syrup, immediately switch off the gas and take away the pan from the hot burner. If you keep boiling the syrup, Laddus will be hard.
2. These Laddus need to be rolled when mixture is hot. So don’t make the entire Jaggery syrup together. Make 3-4 portions of Jaggery. Make syrup of one part; add Sesame Seeds mixture, roll laddus. Repeat this process for remaining parts of Jaggery.
3. When you mix Sesame seeds mixture with Jaggery Syrup, Take out the mixture to a plate. But don’t spread it. Let there be a lump of mixture. This way, mixture will remain hot for longer time and you get some more time to roll laddus.
==================================================================================
काळे गोरे तिळाचे लाडू – खमंग खुसखुशीत लाडू
मी नेहमी साध्या गुळाचे आणि साध्या (पॉलिश न केलेल्या पांढऱ्या ) तिळाचे लाडू करते . ह्यावेळी आणखी एक प्रकारचे लाडू केले. काळे आणि पांढरे ( (पॉलिश न केलेले) तीळ एकत्र करून लाडू केले.पांढरे तीळ भाजून मिक्सर मध्ये अर्धवट बारीक करून घेतले आणि काळे तीळ भाजून न कुटता घातले. लाडू नेहमीच्या पांढऱ्या तिळाच्या लाडवांपेक्षा जास्त छान आणि खमंग होतात. ह्या लाडवांना नाव काय द्यावं सुचत नव्हतं. मग तिळाच्या रंगानुसार काळे गोरे तिळाचे लाडू असं नाव दिलं.
काही जणांकडे काळे तीळ खात नाहीत पण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, कोकणातील काही ठिकाणी काळे तीळ खातात. काही जण तर फक्त काळ्या तिळाचे लाडू करतात. मी काळे तीळ स्वयंपाकात वापरते. चटणी, धिरडी अशा पदार्थात काळे तीळ घातले तर पदार्थ जास्त चविष्ट होतात. तुम्ही जर काळे तीळ खात असाल तर हे लाडू नक्की करून बघा.
नेहमीप्रमाणे माझ्या टिप्स :
१. लाडू कडक न होण्यासाठी गूळ किती वेळ उकळवायचा हे लक्षात घ्यावं लागतं. मी गुळात पाणी घालत नाही. साधा गूळ (बारीक चिरलेला) थोडं तूप घालून एक सारखं ढवळून फक्त वितळेपर्यंत गरम करायचा (कच्चा पाक). गूळ चिरून घेणं महत्वाचं आहे. कारण गुळाचे मोठे तुकडे घातले तर ते तुकडे वितळेपर्यंत पाक कडक होतो. गूळ वितळल्यावर बुडबुडे यायला लागले की लगेच गॅस बंद करून कढई खाली उतरवायची . जास्त वेळ गूळ उकळवला किंवा कढई गरम गॅसवर ठेवली तर पाक कडक होतो (आणि लाडूही).
२. सगळ्या गुळाचा पाक एकदम करू नका. तिळाचे लाडू गरम असतानाच वळावे लागतात नाहीतर मिश्रण सुकते. म्हणून गुळाचे ३–४ भाग करून एका वेळी १ भाग गूळ घालून पाक करा. आणि त्यात मावेल तेव्हढं तिळाचं मिश्रण घाला. म्हणजे लाडू वळायला सोपं पडेल.
३. तिळाचे मिश्रण पाकात घातल्यावर ढवळून लगेच एका ताटात / परातीत काढा. पण मिश्रण पसरू नका. मिश्रणाचा गोळा तसाच ठेवा म्हणजे मिश्रण लगेच गार होणार नाही आणि लाडू वळायला थोडा वेळ मिळेल.
साहित्य
साधे पांढरे तीळ (पॉलिश न केलेले) अर्धा किलो
काळे तीळ अर्धा किलो
भाजलेले शेंगदाणे पाव किलो
किसलेलं सुकं खोबरं पाव किलो
साधा गूळ (चिक्कीचा नाही) बारीक चिरून अंदाजे सव्वा– दीड किलो
वेलची पूड अर्धा टीस्पून
तूप १ टेबलस्पून
कृती
१. पांढरे तीळ मंद आचेवर खमंग भाजून घ्या. रंग जरा बदलला पाहिजे. ताटलीत काढून गार करा.
२. काळे तीळ मंद आचेवर खमंग भाजून घ्या. तीळ तडतडेपर्यंत भाजा. ताटलीत काढून गार करा. खोबरं हाताने चुरून घ्या.
३. खोबरं मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. ताटलीत काढून गार करा.
४. भाजलेले शेंगदाणे सोलून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.
५. पांढरे तीळ मिक्सर मध्ये १–२ दा पल्स मोड मध्ये फिरवून घ्या. तीळ जरा भरडले गेले पाहिजेत. पीठ करू नका. काळे तीळ अख्खेच ठेवा.
६. एका वाडग्यात दोन्ही प्रकारचे तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि वेलची पूड मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही लाडू करायच्या १–२ दिवस आधीही बनवून ठेवू शकता.
७. गुळाचे ३–४ भाग करा.
८. एका कढईत गुळाचा १ भाग आणि पाव चमचा तूप घाला. मंद आचेवर गरम करा. गूळ वितळेल. थोड्या वेळाने बुडबुडे यायला लागतील. लगेच गॅस बंद करून कढई खाली उतरवा.
९. आता पाकात थोडं थोडं तिळाचं मिश्रण पाकाचं मिश्रण घट्ट होईपर्यंत घाला.
१०. आता हाताला जरा तूप लावून लगेच लाडू वळा. लाडू वळताना मिश्रण थंड झालं तर जरा गरम करून घ्या आणि लाडू वळा.
११. गूळ संपेपर्यंत ८–१० स्टेप्स रिपीट करा. शेवटी तिळाचं मिश्रण किती उरलंय त्या अंदाजाने गूळ घ्या.
१२. खमंग, खुसखुशीत काळे गोरे तिळाचे लाडू तयार आहेत.
Your comments / feedback will help improve the recipes