How to Store Lemons? (लिंबं ३–४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं?)
लिंबं ३-४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं? मराठी
We generally buy 8-10 lemons at a time. In hot weather like Mumbai, Lemons can’t be stored without refrigeration. But even with refrigeration, Lemons become soggy and can’t be used. I read a few tricks to store Lemons. But this is the one that I use. This is how you can store Lemons for 3-4 weeks.
1. Wash Lemons and wipe them with a napkin. If there are dark spots on lemons, keep them aside. They cannot be stored; so use them soon.
2. Apply coconut oil on each Lemon on all sides and keep them in a container with a lid.
3. Store the container in Refrigerator. Take out Lemons as and when required. Close the container and keep it back in the refrigerator.
4. This way, Lemons can be stored for 3-4 weeks. Attached photo is clicked 2 weeks after the lemons were stored.
==================================================================================
लिंबं ३–४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं?
आपण एका वेळी साधारणपणे ८–१० लिंबं विकत आणतो. पण मुंबईसारख्या गरम हवेच्या ठिकाणी लिंबं बाहेर ठेवली तर सुकतात. आणि फ्रिजमध्ये ठेवली तर कुजतात . मग काय केलं की लिंबं चांगली राहतील. यासाठी काही युक्त्या वाचनात आल्या. पण इथे लिहिलेली युक्ती मी गेले वर्षभर वापरतेय. बघूया तर लिंबं ३–४ आठवडे चांगली राहण्यासाठी काय करावं ते.
१. लिंबं धुवून, पुसून सुकी करा. लिंबावर काही डाग असतील तर ती वेगळी ठेवा. डाग असलेली लिंबं टिकत नाहीत; ती लगेच वापरून टाका.
२. प्रत्येक लिंबाला सर्व बाजूने खोबरेल तेल लावा आणि झाकण असलेल्या डब्यात ठेवा.
३. डबा बंद करून फ्रिजमध्ये ठेवा. लागतील तशी लिंबं काढून डबा परत झाकण लावून फ्रिजमध्ये ठेवा.
४. अशा प्रकारे ठेवली तर लिंबं ३–४ आठवडे तरी चांगली राहतात. सोबतचा फोटो लिंबं ठेवल्यानंतर २ आठवड्यांनी काढलेला आहे.
Your comments / feedback will help improve the recipes