Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) – Sesame Seeds Soft Burfi

Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) - Sesame Seeds Burfi
Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) - Sesame Seeds Burfi

Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) – Sesame Seeds Soft Burfi

तिळाची खमंग खुसखुशीत वडी मराठी

This is a recipe of Soft (खुसखुशीत) Til Vadi (Burfi) that anyone can eat without a nut cracker. This Burfi is made for Makar Sankranti (Kite Festival). Since Chikki (sticky) Jaggary (Gul) is not used in this, Burfi is soft (Khuskhushit in Marathi). Anyone can eat it easily. Also since I grind sesame seeds a bit, Burfi taste better (Khamang in Marathi).

Ingredients (1 cup = 250 ml)

White Sesame Seeds (Unpolished) 1.25 cups

Groundnuts ¼ cup

Dry Coconut (kopra) ½ cup

Jaggery (Non chikki – non sticky) 1 cup

Cardamom powder ¼ teaspoon

Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Instructions

1. Dry Roast sesame seeds on medium heat till light brown and keep aside.

2. Roast Groundnuts separately.

3. Grate dry coconut and roast on medium heat till light brown.

4. Transfer roasted sesame seeds to a grinder and pulse grind for 2 seconds; seeds should just break; Do not make a powder.

5. Grind roasted groundnuts into a coarse powder.

6. Crush roasted dry coconut by hand.

7. Mix all the about ingredients and add cardamom powder. Grease a flat plate / try for Burfi.

8. Heat a thick bottom pan. Add ghee and melt it. Add Jaggery. Heat the pan on medium heat till Jaggery melts and you start seeing bubbles on the syrup; keep stirring all the time.

9. Take the pan off the heat; add dry mixture to Jaggery syrup and quickly mix it.

10. Immediately transfer the mixture to the greased plate and level it. While the mixture is hot, using a knife make the marks to cut the pieces of desired shape / size. Leave the mixture to cool. Delicious Sesame Seeds Burfi is ready.

Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) - Sesame Seeds Burfi
Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) – Sesame Seeds Burfi

11. Once the mixture is cool, take out the Burfi pieces and transfer to a container with a lid.

12. This Burfi can be stored for 3 weeks without refrigeration.

Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) - Sesame Seeds Burfi
Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) – Sesame Seeds Burfi
Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) - Sesame Seeds Burfi
Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) – Sesame Seeds Burfi

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

तिळाची खमंग खुसखुशीत वडी

मकरसंक्रांतीसाठी तिळाचे लाडू / वड्या पाहिजेतच. तिळाच्या खुसखुशीत लाडवांची रेसिपी मी आधीच पोस्ट केली आहे. ही तिळाच्या खुसखुशीत वड्यांची रेसिपी. वड्या खुसखुशीत होण्यासाठी साधा गूळ वापरावा. आणि वड्या खमंग होण्यासाठी साधे तीळ खमंग भाजून जरा बारीक करून घ्यावेत. अगदी सोपी रेसिपी आहे. ज्यांना लाडू करणं कठीण वाटतं त्यांना ह्या वड्या करणं सहज जमेल.

साहित्य (१ कप = २५० मिली )

साधे पांढरे तीळ (पॉलिश न केलेले) सव्वा कप

भाजलेले शेंगदाणे पाव कप

किसलेलं सुकं खोबरं अर्धा कप

साधा गूळ (चिक्कीचा नाही) बारीक चिरून१ कप

वेलची पूड पाव टीस्पून

तूप १ टीस्पून

कृती

. तीळ मंद आचेवर खमंग भाजून घ्या. रंग जरा बदलला पाहिजे. ताटलीत काढून गार करा.

. खोबरं मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. ताटलीत काढून गार करा.

. भाजलेले शेंगदाणे सोलून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.

. खोबरं हाताने चुरून घ्या.

. तीळ मिक्सर मध्ये १२ दा पल्स मोड मध्ये फिरवून घ्या. तीळ जरा भरडले गेले पाहिजेत. पीठ करू नका.

. एका वाडग्यात तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि वेलची पूड घालून मिश्रण एकत्र करा. वड्या थापायच्या ताटली / ट्रे ला तूप लावून घ्या.

. एका कढईत तूप आणि गूळ घालून मंद आचेवर गरम करा. मिश्रण ढवळत राहा.गूळ वितळला आणि बुडबुडे यायला लागले की लगेच गॅस बंद करून कढई खाली उतरवा.

. आता पाकात तिळाचं मिश्रण घाला आणि ढवळून घ्या.

. लगेच मिश्रण ताटलीत घालून तूप लावलेल्या वाटीने पसरून समतल करा. मिश्रण गरम असतानाच सुरी फिरवून हव्या त्या आकाराचे तुकडे कापून घ्या.

१०. मिश्रण गार झालं की वड्या ताटलीतून काढून झाकणाच्या डब्यात ठेवा.

११. तिळाच्या खमंग खुसखुशीत वड्या तयार आहेत. ह्या वड्या फ्रिजमध्ये न ठेवता ३ आठवडे चांगल्या राहतात.

Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) - Sesame Seeds Burfi
Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) – Sesame Seeds Burfi
Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) - Sesame Seeds Burfi
Til Vadi (तिळाची खमंग खुसखुशीत वडी ) – Sesame Seeds Burfi

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes