Navalkol Pananche Theple (नवलकोलच्या पानांचे ठेपले ) – Kohlrabi (German Turnip) Greens Thepla / Spicy Roti
नवलकोलच्या पानांचे ठेपले मराठी
Thepla is a popular Gujarati snack. Generally Thepla is made using Methi (Fenugreek Leaves) or just by adding spices without any greens. I make Thepla using Kohlrabi / German Turnip / Ganth Gobi / Navalkol greens. One secret ingredient that I add is Rajgira (Amaranth) flour. This keeps Thepla softer for longer time and it improves the nutrition value of the Thepla. Make sure you use tender leaves of Kohlrabi for this Thepla.
Ingredients (For 15-18 Theplas) (1 cup = 250 ml)
Finely Chopped Navalkol Greens about 3 cup
Wheat Flour 2 cups
Rajgira (Amaranth) flour 1 cup
Curd 1 tablespoon
Fresh Cream (Malai) 1 tablespoon
Chili paste ½ teaspoon
Ginger Garlic Paste 1 teaspoon
Coriander Powder 1 teaspoon
Cumin Powder ½ teaspoon
Red Chili Powder ½ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Sugar 1-2 teaspoon
Sesame Seeds 2-3 tablespoon
Oil 2 tablespoon + as required for roasting Theplas
Salt to taste
Instructions
1. In a pan heat ½ teaspoon oil, add Ginger Garlic paste and saute for 2 minutes. Add chopped Navalkol Greens and mix. Cook covered on low flame till Greens are tender. Stir after 2-3 minutes. Let the cooked Greens cool.
2. In a bowl, mix All ingredients along with cooked Greens except Sesame seeds. Add 1 tablespoon sesame seeds and save remaining to be used while rolling Theplas. Add little water at a time and bind a medium stiff consistency dough. Let the dough rest for 10 minutes.
3. Knead the dough for 3-4 minutes.
4. Make big lemon size balls of dough. Dip each dough ball in sesame seeds and roll a round Thepla little thicker than Chapati. Use Wheat flour for dusting.
5. Roast Theplas on hot Griddle on medium flame. Use some oil while roasting.
6. Serve Theplas with Chutney of your choice and curd / home made butter.
==================================================================================
नवलकोलच्या पानांचे ठेपले
मेथीचे ठेपले तुम्ही नेहमीच बनवत असाल. मी नवलकोलच्या (अल्कोल) पानांचे ठेपले करते. ठेपले आणखी पौष्टिक होण्यासाठी त्यात राजगिरा पीठ घालते. त्यामुळे ठेपले गार झाल्यावर सुद्धा नरम राहतात. साहित्य नेहमीचंच आहे. पुढच्या वेळी नवलकोल आणताना कोवळी पानं बघून आणा आणि हे चविष्ट ठेपले करून बघा.
साहित्य (१५–१८ ठेपल्यांसाठी) (१ कप = २५० मिली )
नवलकोलची बारीक चिरलेली पानं ३ कप
कणिक २ कप
राजगिरा पीठ १ कप
दही १ टेबलस्पून
दुधाची साय १ टेबलस्पून
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून
आलं लसूण पेस्ट १ टीस्पून
धने पावडर १ टीस्पून
जिरे पावडर अर्धा टीस्पून
लाल तिखट अर्धा टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
तीळ २–३ टेबलस्पून
साखर २ टीस्पून
तेल २ टेबलस्पून + ठेपले भाजायला
मीठ चवीनुसार
कृती
१. एका कढईत अर्धा टीस्पून तेल गरम करून आलं लसूण पेस्ट २ मिनिटं परतून घ्या. त्यात नवलकोलची चिरलेली पानं घालून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घ्या. शिजलेली पानं गार झाली की एका परातीत काढा.
२. त्यात तीळ वगळून सगळे पदार्थ एकत्र करून छान मिक्स करून घ्या. १ टेबलस्पून तीळ घाला. थोडं थोडं पाणी घालून मध्यम घट्ट पीठ भिजवून घ्या.
३. १० मिनिटानंतर पीठ ३–४ मिनिटं मळून घ्या.
४. पिठाचे मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे करा. प्रत्येक गोळा तिळामध्ये बुडवून ठेपले लाटून घ्या. पोळीपेक्षा जरा जाड लाटा. गरम तव्यावर थोडं तेल घालून मध्यम आचेवर ठेपले दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
५. गरमागरम ठेपले चटणी, दही / लोण्यासोबत खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes