Moong Laadoo (मुगाचे खमंग आणि पौष्टिक लाडू) – Green Gram Laddu
मुगाचे खमंग आणि पौष्टिक लाडू मराठी
These are very healthy and tasty Laadoos made from whole Moong (Green Gram) flour. I’ve added Khaskhas (poppy seeds) to make it more delicious. But you can skip it if you don’t like it.
Ingredients
Whole Moong (Green Gram) flour 2 cups
Jaggery Crushed/grated ¾ cup
Powdered sugar ¾ cup
Pure Ghee (Clarified Butter) ¾ cup – Use at room temperature
Cashew Nut 15-20 chopped
Cardamom (Eliachy) Powder ¼ teaspoon
Poppy Seeds (Khaskhas) 2 tablespoon (optional)
Instructions
1. Dry roast Khaskhas till light brown. Leave it to cool. Grind into a coarse powder. Use grinder in pulse mode for a few seconds. Else the powder will become oily.
2. Roast Moong flour with pure ghee, on medium flame, till light brown. There will be nice aroma of roasted flour.
3. Turn off the flame.
4. Add the jaggery to roasted flour and mix well.
5. After 5 minutes add powdered sugar and mix well.
6. Add chopped cashew nuts and cardamom (Eliachy) powder. Mix well.
7. Let it cool till mixture becomes warm. Keep stirring in regularly.
8. Make lemon size laddus. If the mixture is too dry and difficult to roll laddus, add a spoonful of ghee and heat the mixture for a couple of minutes. Then roll laddus.
Note:
1. Whole Moong flour is used in this recipe. Not Moongdal (Split Green Gram) flour. You can make laddus of Moongdal flour also like Besan laddu. But Laddus made with whole Moong flour are more delicious.
2. If you don’t get Moong flour in the market, get Chhilakewai Moong Dal (Split Green Gram with husk). Dry roast it till light brown and you get nice aroma of roasted gram. After cooling grind it in grinder into fine powder.
3. Amount of Ghee (Clarified Butter) required for laddus depends on coarseness of the flour. Fine flour needs less Ghee and coarse needs more.
Variation:
1. If you like honey, add ¼ cup of honey in step 5 and mix it. Since honey is sweet and moist, reduce powdered sugar to ½ cup and reduce ghee to ½ cup. If the mixture is dry and you are not able to roll laddus, add a spoonful of ghee and mix. You will be able to roll laddus. With honey the taste of laddus enhances. Try this.
2. You can also add 1 tablespoon of Milk after roasting Moong Flour. Switch off the gas, add milk and quickly mix till the bubbles stop. This gives a different texture and taste to Laddus.
===================================================================================
मुगाचे खमंग आणि पौष्टिक लाडू
अख्ख्या मुगाचे पीठ वापरून बनवलेले हे लाडू खूप खमंग लागतात आणि पौष्टिक ही असतात. मी ह्यात मध घालते त्यामुळे तूप आणि साखर कमी लागते. गूळ आणि साखर दोन्ही घालते. फक्त गुळाचे लाडू कडक होतात; नरम करण्यासाठी तूप जास्त घालावे लागते. मध घालायचा नसेल तर तूप आणि साखर जास्त घ्या. मी मुगाचं पीठ भाजल्यावर दुधाचा हबका मारून पीठ फुलवते. त्यामुळे लाडू छान हलके होतात. दूध वापरायचं नसेल तर भाजलेलं पीठ तसंच वापरा.
साहित्य
मुगाचे पीठ २ कप
बारीक चिरलेला गूळ पाऊण कप
पिठीसाखर अर्धा कप
मध ४ मोठे चमचे
तूप अर्धा कप (अंदाजे) – गरम न करता वापरा
काजूचे तुकडे २ मोठे चमचे
वेलची पूड पाव चमचा
दूध १ मोठा चमचा
खसखस २ टेबलस्पून (ऐच्छिक)
कृती
१.खसखस मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
२. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप आणि मुगाचे पीठ घाला. मध्यम आचेवर लालसर रंगावर खमंग भाजून घ्या. सारखे ढवळत रहा म्हणजे पीठ जळणार नाही.
३. गॅस बंद करून पिठात दूध घाला आणि लगेच मिक्स करा. बुडबुडे यायचे बंद होईपर्यंत ढवळत रहा. पीठ एका पातेल्यात काढून गार करायला ठेवा.
४. कोमट झाल्यावर चिरलेला गूळ मिक्स करा. पिठीसाखर घालून नीट मिक्स करा.
५. काजूचे तुकडे, खसखस आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
६. आता मध घालून मिक्स करा आणि हव्या त्या आकाराचे लाडू बनवा.
७. जर पीठ सुके झाले असेल आणि लाडू वळता येत नसतील तर एक चमचा तूप घालून मिक्स करा आणि लाडू वाला. एकदम जास्त तूप घालू नका. थोडे थोडे घाला.
८. हे लाडू ३–४ आठवडे टिकतात (शिल्लक राहिले तर).
टीप
१. मुगाचे पीठ नसेल तर सालाची मुगाची डाळ सुकीच लालसर रंगावर भाजून घ्या आणि गार झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक पीठ करा.
२. मध घालायचा नसेल तर तूप आणि साखर पाऊण कप घ्या.
३. पिठाच्या जाडसर पणावर तुपाचे प्रमाण ठरते. पीठ जाड असेल तर तूप जास्त लागते.
Your comments / feedback will help improve the recipes