Rava Naral Laadoo (रवा नारळ लाडू) – Rava Coconut Laddus / Semolina Coconut Laddus
This is one more popular recipe from Konkan where we add fresh scraped coconut to Rava Laddus. It tastes delicious. These are also called Raghavdas laadoo (राघवदास लाडू).
My Tips
1. It is most important to make right consistency sugar syrup for these Laddus.
2. If Sugar Syrup happens to be lesser than ‘one string’ consistency, laddu mixture will be very moist. And you will not be able to roll laddus immediately. Keep the mixture partially covered and check after every 10-15 minutes if the mixture is dry enough to roll the laddus.
3. If Sugar Syrup happens to be thicker than ‘one string’ consistency, mixture will immediately become dry and you won’t be able to roll laddus. Sprinkle 2 teaspoons milk, mix the mixture together and try to roll laddus. If you are still not able to roll laddus, sprinkle some more milk and repeat the process.
4. You should use fresh scraped coconut for these laddus. That tastes the best. Also use only white portion of scraped coconut so the laddus will look nice. In case scraped coconut is not available, remove the brown part from fresh coconut, grind the white part in grinder and use that for laddus. If you use desiccated coconut, taste of the laddus will be different.
Ingredients (1 cup = 250 ml) (Makes 28-30 laadoo)
Rava Barik (Semolina Fine) 2 cups
Sugar 1+ ¾ cups
Fresh scraped coconut 1 cup
Saffron (Kesar) 2 pinches
Cardamom (Eliachi) Powder ¼ teaspoon
Pure Ghee (Clarified Butter) ¾ cup
Instructions
1. Roast Semolina with pure ghee, on medium flame.
2. After 10 minutes, add scraped coconut. roast till light brown.
3. Soak saffron in a spoonful of water.
4. In a thick bottom pan add sugar and ¾ cup water.
5. Make a syrup (chasni) of it. boil it till it reaches to one string consistency (in marathi we say “ek taari paak”). Keep stirring all the time.
6. Add saffron. Turn off the flame.
7. Slowly add the roasted rava and mix well. Add cardamom powder and mix well.
8. Keep stirring for about 10 minutes.
9. Let it cool; stir every 5 minutes. Mixture will start to thicken.
10. While mixture is warm and dry enough to roll laddus, make lemon size laddus.
Note
1. These laddus will last for 3-4 days without refrigeration. If you want to keep them longer, then keep in a closed container and store in refrigerator. Before eating, you can microwave it for 10 seconds. Or take laddus out from refrigerator 1 hour before you want to eat them. Then no need to microwave them.
2. Ek Taari Paak (Single Thread Sugar Syrup)This is the terminology used to indicate the thickness of Sugar Syrup (Paak). Mix Sugar with water and start boiling the mixture. It is necessary to keep stirring the mixture continuously. When the mixture starts boiling, you can stir the mixture after every couple of minutes. After boiling it for a few minutes when it starts getting sticky, you should start checking the consistency of syrup. Take a drop of syrup on the index finger. Using thumb and the index finger pull the drop. Because the mixture is sticky, threads will form. If you see a single thread, it is Ek Taari Paak (Single Thread Syrup). If you don’t see any threads, cook the mixture further. If you cook the mixture after Ek Taari Paak you will get Don Taari Paak (Two String Syrup) when you see 2 threads. You can continue cooking to get thicker sugar syrup this way.Remember to turn the gas to low flame while you check syrup consistency. Also keep a bowl of water ready so that you can dip and clean your fingers after checking the syrup every time.
==================================================================================
रवा नारळ लाडू – कोकणातली पारंपारिक लोकप्रिय रेसिपी
रव्याच्या लाडवांची ही कोकणातली पारंपारिक लोकप्रिय रेसिपी आहे. ह्या लाडवांना राघवदास लाडू असंही म्हणतात. ह्यात रव्याबरोबर ओला नारळ घातला जातो. अतिशय स्वादिष्ट लागतात हे लाडू. ह्या रेसिपीत साखरेचा व्यवस्थित पाक बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. साखरेचा पाक कसा करायचा तेही लिहिलं आहे रेसिपी च्या शेवटी.
साखरेच्या पाकाशिवाय लाडवांची रेसिपी हवी असेल तर माझी “रवा नारळ मलई लाडू” रेसिपी वाचा. मी हल्लीच ग्रुपवर पोस्ट केली होती.
माझ्या टिप्स
१. ह्या रेसिपीत साखरेचा व्यवस्थित पाक बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. पाक जास्त झाला तर लाडू वळता येणार नाहीत. म्हणून पाक बनवताना लक्ष ठेवा.
२. पाक कमी झाला तर मिश्रण ओलं राहतं आणि लाडू लगेच वळता येत नाहीत. अशा वेळी मिश्रण अर्धवट झाकून ठेवा आणि दर १०– १५ मिनिटांनी बघा लाडू वळता येतील इतपत सुकं झालंय का.
३. पाक जास्त झाला तर मिश्रण लगेच कोरडं होतं आणि लाडू वळता येत नाहीत. अशा वेळी थोडा दुधाचा हबका मारून मिश्रण एकजीव करा आणि लाडू वळा. एका वेळी २ चमचे दूध घाला.
४. ह्या लाडवांमध्ये ओला खवलेला नारळाचं छान लागतो. आणि खवताना नारळाचा पांढरा चव घातला तर लाडू सुरेख दिसतात. नारळ किसून घालू नका. खवलेला नारळ नसेल तर नारळाचा पांढरा भाग मिक्सरमध्ये बारीक करून घाला. डेसिकेटेड कोकोनट घातलात तर चव बिघडेल.
साहित्य (१ कप = २५० मिली ) (२८–३० लाडवांसाठी )
बारीक रवा २ कप
साखर पावणे दोन कप
ताजा खवलेला नारळ १ कप
केशर २ चिमूट
वेलची पूड पाव चमचा
साजूक तूप पाऊण कप
कृती
१. एका कढईत तूप आणि रवा घालून माध्यम आचेवर भाजा. सारखं ढवळत राहा.
२. १० मिनिटांनी खवलेला नारळ घाला आणि परत ढवळून भाजत राहा .
३. रवा गुलाबी रंगावर भाजला की गॅस बंद करा.
४. केशर चमचाभर पाण्यात भिजवा.
५. एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर आणि पाऊण कप पाणी घ्या. गॅसवर ठेवून सारखं ढवळत राहा. एक तारी पाक करा.
५. केशर घाला. मिक्स करून गॅस बंद करा.
६. आता भाजलेला रवा हळू हळू पाकात घाला आणि ढवळून मिश्रण एकजीव करा. गुठळी होऊ देऊ नका.
७. वेलची पूड घालून मिक्स करा.
८. १० मिनिटं मिश्रण ढवळत राहा.
९. आता मिश्रण गार करायला ठेवा. ५–५ मिनिटांनी एकदा ढवळा. मिश्रण हळू हळू सुकायला लागेल.
१०. मिश्रण कोमट झाल्यावर लाडू वळता येतील तितपत घट्ट झाल्यावर मध्यम आकाराचे लाडू वळा.
टीप
१. हे लाडू फ्रिज मध्ये न ठेवता ३–४ दिवस राहतात. जास्त दिवस ठेवायचे असतील तर फ्रिज मध्ये ठेवा. खायला देताना फ्रिजमधून काढून मायक्रोवेव्ह मध्ये १० सेकंद गरम करून द्या किंवा खायच्या १ तास आधी फ्रिज मधून लाडू बाहेर काढून ठेवा.
साखरेचा पाक कसा करायचा ?
साखर आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर ढवळत राहायचं. साखर वितळली की अजून उकळायचं. पाक चिकट व्हायला लागला की हाताच्या बोटावर एक थेंब पाक घेऊन अंगठा आणि बोटानी पाक ओढायचा / ताणायचा. मध्ये एक तार दिसली की एक तारी पाक तयार आहे. एक तार नाही दिसली तर अजून उकळायचा.
पाकाला लागणारा वेळ गॅस ची आंच किती आहे यावर अवलंबून आहे. मध्यम आचेवर ह्या प्रमाणाला एक तारी पाकाला १२–१५ मिनिटं लागतात. पाक चिकट झाल्यावर २–२ मिनिटांनी पाक झाला का ते बघितलेलं बरं. आणि पाक बघताना गॅस बारीक ठेवावा. एका वाटीत थोडं पाणी घेऊन ठेवावं. म्हणजे पाक बघितल्यावर परत परत हात धुवायला नकोत. वाटीतल्या पाण्यात हात बुडवले की झाले.
रेसेपी समजाऊन सांगण्याची पद्धत खूप छान आहे जे अवघड आहे ते सोपे करून सांगितले उदा. साखरेचा पाक मस्त
मनापासून आभार.
Please share how to make the sugar syrup of the precise consistency.
Process of making Sugar Syrup has been added in the Notes of this recipe. Please check.