Rava Naral Laadoo (रवा नारळ लाडू) – Rava Coconut Laddus / Semolina Coconut Laddus

Rava Naral Laadoo (रवा नारळ लाडू)

Rava Naral Laadoo (रवा नारळ लाडू) – Rava Coconut Laddus / Semolina Coconut Laddus

रवा नारळ लाडू मराठी

This is one more recipe from Konkan where we add fresh scraped coconut to Rava Laddus. It tastes delicious.

Ingredients (Makes 20-22 laddus)

Rava Barik (Semolina Fine) 2 cups

Sugar 1+ ¾ cups

Fresh scraped coconut 1 cup

Saffron (Kesar) 2 pinches

Cardamom (Eliachy) Powder ¼ teaspoon

Pure Ghee ¾ cup

Instructions

1. Roast barik rava with pure ghee, on medium flame.

2. After 10 minutes, add scraped coconut. roast till light brown.

3. Soak saffron in a spoonful of water.

4. In a thick bottom pan add sugar and ¾ cup water.

5. Make a syrup (chasni) of it. boil it till it reaches to one string consistency (in marathi we say “ek taari paak”). Keep stirring all the time.

6. Add saffron.

7. Turn off the flame.

8. Slowly add the roasted  rava and mix well.  add cardamom  powder and mix well.

9. Keep stirring for about 10 minutes.

10. Let it cool; stir every 5 minutes. Mixture will start to thicken.

11. While mixture is warm and dry enough to roll laddus, make lemon size laddus.

Rava Naral Laadoo
Rava Naral Laadoo

Note:

1. The most important step in this recipe is to make right consistency syrup. If Syrup is overcooked, you will not be able to roll laddus. So be watchful.

2. These laddus will last for 3-4 days without refrigeration. If you want to keep them longer, then keep in a closed container and store in refrigerator. Before eating, you can microwave it for 10 seconds. Or take laddus out from refrigerator 1 hour before you want to eat them. Then no need to microwave them.

3. Ek Taari Paak (Single Thread Sugar Syrup)This is the terminology used to indicate the thickness of Sugar Syrup (Paak). Mix Sugar with water and start boiling the mixture. It is necessary to keep stirring the mixture continuously. When the mixture starts boiling, you can stir the mixture after every couple of minutes. After boiling it for a few minutes when it starts getting sticky, you should start checking the consistency of syrup. Take a drop of syrup on the index finger. Using thumb and the index finger pull the drop. Because the mixture is sticky, threads will form. If you see a single thread, it is Ek Taari Paak (Single Thread Syrup). If you don’t see any threads, cook the mixture further. If you cook the mixture after Ek Taari Paak you will get Don Taari Paak (Two String Syrup) when you see 2 threads. You can continue cooking to get thicker sugar syrup this way.Remember to turn the gas to low flame while you check syrup consistency. Also keep a bowl of water ready so that you can dip and clean your fingers after checking the syrup every time.=================================================================================

रवा नारळ लाडू

रव्याच्या लाडवांची ही कोकणातली लोकप्रिय रेसिपी आहे. ह्यात रव्याबरोबर ओला नारळ घातला जातो. अतिशय स्वादिष्ट लागतात हे लाडू.

साहित्य (२०-२२ लाडवांसाठी)

बारीक रवा २ कप

साखर पावणे दोन कप

ताजा खवलेला नारळ १ कप

केशर २ चिमूट

वेलची पूड पाव चमचा

साजूक तूप पाऊण कप

कृती

. एका कढईत तूप आणि रवा घालून माध्यम आचेवर भाजा. सारखं ढवळत राहा.

. १० मिनिटांनी खवलेला नारळ घाला आणि परत ढवळून भाजत राहा .

. रवा गुलाबी रंगावर भाजला की गॅस बंद करा.

. केशर चमचाभर पाण्यात भिजवा.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर आणि पाऊण कप पाणी घ्या. गॅसवर ठेवून सारखं ढवळत राहा. एक तारी पाक करा.

. केशर घाला. मिक्स करून गॅस बंद करा.

. आता भाजलेला रवा हळू हळू पाकात घाला आणि ढवळून मिश्रण एकजीव करा. गुठळी होऊ देऊ नका.

. वेलची पूड घालून मिक्स करा.

. १० मिनिटं मिश्रण ढवळत राहा.

. आता मिश्रण गार करायला ठेवा. ५ मिनिटांनी एकदा ढवळा. मिश्रण हळू हळू सुकायला लागेल.

१०. मिश्रण कोमट झाल्यावर लाडू वळता येतील तितपत घट्ट झाल्यावर मध्यम आकाराचे लाडू वळा.

Rava Naral Laadoo (रवा नारळ लाडू)
Rava Naral Laadoo (रवा नारळ लाडू)

टीप

. ह्या रेसिपीत साखरेचा व्यवस्थित पाक बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. पाक जास्त झाला तर लाडू वळता येणार नाहीत. म्हणून पाक बनवताना लक्ष ठेवा.

. हे लाडू फ्रिज मध्ये न ठेवता ३४ दिवस राहतात. जास्त दिवस ठेवायचे असतील तर फ्रिज मध्ये ठेवा. खायला देताना फ्रिजमधून काढून मायक्रोवेव्ह मध्ये १० सेकंड गरम करून द्या किंवा खायच्या १ तास आधी फ्रिज मधून लाडू बाहेर काढून ठेवा.

साखरेचा पाक कसा करायचा ?

साखर आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर ढवळत राहायचं. साखर वितळली की अजून उकळायचं. पाक चिकट व्हायला लागला की हाताच्या बोटावर एक थेंब पाक घेऊन अंगठा आणि बोटानी पाक ओढायचा / ताणायचा. मध्ये एक तार दिसली की एक तारी पाक तयार आहे. एक तार नाही दिसली तर अजून उकळायचा.   

पाकाला लागणारा वेळ गॅस ची आंच किती आहे यावरअवलंबून आहे. मध्यम आचेवर ह्या प्रमाणाला एक तारी पाकाला १२१५ मिनिटं लागतातपाक चिकट झाल्यावर २२ मिनिटांनी चेक केलेलं बरं. आणि चेक करताना गॅस बारीक ठेवावा. एका वाटीत थोडं पाणी घेऊन ठेवावं. म्हणजे पाक चेक केल्यावर परत परत हात धुवायला नकोत. वाटीतल्या पाण्यात हात बुडवले की झाले.

4 Comments

  1. रेसेपी समजाऊन सांगण्याची पद्धत खूप छान आहे जे अवघड आहे ते सोपे करून सांगितले उदा. साखरेचा पाक मस्त

Leave a Reply

Your email address will not be published.


*