Tavsale / Dhondas (तवसळे – धोंडस – काकडीचा केक) – Cucumber Cake

Tavsale - Dhondas (तवसळे - धोंडस (काकडीचा केक))

Tavsale / Dhondas (तवसळे धोंडस काकडीचा केक) – Cucumber Cake

तवसळे (धोंडस)  काकडीचा केक मराठी

This is a Goan/ Konkani recipe using cucumber. It’s called Tavsale in Goa and Dhondas in Konkan. Generally prepared using dark green cucumber that you get in rainy season. But you can also make this using light green cucumber that are generally available all through the year. Tavsale is made by adding Semolina, Fresh coconut and Jaggery to grated cucumber. The mixture is baked like a cake. Also, if you don’t have oven, you can bake Tavsale in Pressure Cooker or in a pan. In some places Tavsale is made by steaming the mixture rather than baking.

Ingredients (1 cup = 250 ml)

Grated cucumber 2.5 cups

Semolina Coarse (Rava Jada) 1 cup

Fresh scraped Coconut ½ cup

Jaggery crushed 1 cup

Cardamom (Eliachy) Powder ½ teaspoon

Pure Ghee (Clarified Butter) 2 tablespoon

Cashew Nuts chopped 2 tablespoons

Salt ½ teaspoon

Instructions

1. Peel the cucumber, remove seeds and grate. Do not drain the water.

2. Roast Semolina, in a pan with 1 tablespoon ghee, on medium flame, till light brown.

3. Add grated cucumber, jaggery, grated coconut and mix well.

4. Cook the mixture without covering it till jaggery melts, keep stirring.

5. Add chopped cashew nut, salt, cardamom (Eliachi) powder and pure ghee and mix well.

6. Prepare baking dish by applying pure ghee to the sides and bottom.

7. Pre-heat the oven at 200 0 C for 10 minutes.

8. Transfer the mixture into a baking dish (8 to 10 inch diameter), spread evenly 1 inch thick. Apply little ghee on the top to get a nice glaze.

Mixture ready for baking (मिश्रण भाजण्यासाठी तयार)

9. Bake at 200 0 C for 30-35 minutes or till the upper crust is light brown.

10. Cut into 1 x 1 inch pieces after cooling.

11. Enjoy Delicious mild sweet Tavsale.

Tavsale – Dhondas (तवसळे – धोंडस (काकडीचा केक))

===================================================================================

तवसळे धोंडस (काकडीचा केक)

तवसळे धोंडस हा गोवा / कोकणातला पदार्थ आहे. काकडी, रवा, नारळ आणि गूळ घालून भाजून बनवलेला हा पदार्थ अतिशय स्वादिष्ट लागतो. गोव्यात ह्याला तवसळे म्हणतात आणि कोकणात धोंडस. काही ठिकाणी हा पदार्थ वाफवून करतात तर काही ठिकाणी भाजून. ओव्हन नसेल तर कढईत / पातेलीत सुद्धा तवसळे भाजू शकतापावसाळ्यात मिळणारी मोठी गडद हिरवी काकडी (तवसे) वापरून तवसळे करतात पण मोठी काकडी नसेल तर नेहमी मिळणारी काकडी वापरून सुद्धा तवसळे करता येते. ब्रेकफास्ट, नाश्त्यासाठी, मुलांना डब्यात किंवा जेवणात / जेवणानंतर कधीही खाऊ शकता

साहित्य (१ कप = २५० मिली )

काकडीचा कीस अडीच कप

जाडा रवा १ कप

गूळ १ कप

ताजा खवलेला नारळ अर्धा कप

वेलची पूड अर्धा चमचा

साजूक तूप २ टेबलस्पून

काजूचे बारीक तुकडे २ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. काकडी धुवून सोलून जून बिया असतील तर काढून टाका. कोवळ्या बिया असतील तर काढू नका. काकडी किसून घ्या. काकडीचं पाणी किसाबरोबर ठेवा.

. एका कढईत १ टेबलस्पून साजूक तूप घालून रवा मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या.

. कढईत काकडीचा कीस, गूळ, नारळ घालून मिक्स करा.

. मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत झाकण न ठेवता शिजवा. एकसारखं ढवळत रहा म्हणजे मिश्रण कढईला चिकटणार नाही.

. आता मीठ, काजू तुकडे आणि वेलची पूड घालून मिक्स करा. गॅस बंद करा

. केक च्या ट्रे ला तूप लावून घ्या.

. ओव्हन २०० डिग्री वर १० मिनिटं प्रीहीट करा.

. मिश्रण केकच्या ट्रे मध्ये घालून नीट पसरून घ्या. वरून उरलेले साजूक तूप लावा.

Mixture ready for baking (मिश्रण भाजण्यासाठी तयार)

. ओव्हन मध्ये २०० डिग्री वर ३०३५ मिनिटं किंवा वरची बाजू जरा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

१०. गार झाल्यावर हवे तसे तुकडे कापा.

११. स्वादिष्ट तवसळे तयार आहे. गार किंवा गरम कसे ही छान लागते

Tavsale – Dhondas (तवसळे – धोंडस (काकडीचा केक))

2 Comments

  1. व्वा माझ्या साठी एकदम नवा पदार्थ नक्की करून बघेल

Your comments / feedback will help improve the recipes