
Ukadiche Modak (उकडीचे मोदक) – Sweet Steamed Rice Dumplings
Ukadiche Modak is a Maharashtrian specialty – sweet streamed rice dumplings. This is generally made as Prasad for Ganapati. One needs to practise to make perfect Modak. They are yummicious.
Ingredients (Makes 20-22 Modak) (1 cup = 200 ml)
Fresh scraped coconut 4 cup
Crushed Jaggery 3 cup
Home made butter / ghee 2 teaspoon
Salt 2 pinch
Cardamom (Eliachy) powder ¼ teaspoon
Rice flour 4 cup (use modak flour that is made using aromatic rice)
Oil if required
Instructions
For filling
1. Mix scraped coconut and jaggery in a thick bottom pan. Cook on low flame stirring all the time till jaggery is dissolved and mixture starts getting thick
2. Add a pinch of salt and eliachy powder. Mix. Switch off the gas and let the filling cool.

For Cover
1. Heat 3+3/4 cup water in a pan. Add pinch of salt and butter/ghee
2. Let water boil
3. Pour in rice flour and mix.
4. Cook covered for 2 minutes and switch off the gas. Keep the pan covered.
5. After 10 minutes, take out the dough in a plate and knead well to get soft dough. Use water if required. Use little oil if the dough is sticky. Dough for cover is ready.


To make Modak
1. Keep the dough covered all the time.
2. Take a 2 inch ball of dough. Flatten the dough using fingers into a thin bowl. You can also roll the dough into a puri if you find that easier.

3. Hold this dough bowl or puri in your hand; place 1 teaspoon of coconut filling in the centre. Pinch the edges 8-9 times. Now gather the edges together and seal it. Remove any excess dough on the top. Keep modak covered with wet cloth while you make enough numbers depending on size of your steamer.




4.Fill water in the steamer. Spread a wet cloth on the perforated plate. Dip the base of each Modak in cold water and place it on the perforated plate. Steam them for 20-25 minutes.
5. Serve hot with home made ghee. They taste super yummy.
====================================================================================उकडीचे मोदक
हा महाराष्ट्रातला लोकप्रिय पदार्थ आहे. सर्व साधारणपणे गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून हे मोदक बनवतात. बनवायला जरा कठीण आहे. सुरुवातीलाच सांगते की मोदक हे पहिल्या / दुसऱ्या प्रयत्नात येणारी गोष्ट नाही. तसं हवं असेल तर सरळ साच्यात घालून मोदक करा. पण ४–५ वेळा प्रयत्न केलात तर नक्कीच मोदकासारखा आकार जमेल. माझे वडील म्हणायचे तसं ‘पदार्थ मोदकाच्या संज्ञेला पात्र होईल‘. तर निराश होऊ नका. प्रयत्न करत राहा.
साहित्य (२०–२२ मोदकांसाठी – आकारानुसार कमी / जास्त होतील) (१ कप = २०० मिली )
ताजा खवलेला नारळ ४ कप
चिरलेला गूळ ३ कप (जास्त गोड हवं असेल तर जास्त घाला )
लोणी / साजूक तूप २ चमचे
मीठ २ चिमूट
वेलची पावडर पाव चमचा
मोदकाचं पीठ ४ कप (नसेल तर तांदुळाचं पीठ वापरा )
तेल अंदाजे १ चमचा उकड मळायला
कृती
१. नारळ, गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजवा. घट्ट होत आलं की मीठ आणि वेलची पूड घालून गॅस बंद करा. आणि सारण गार करून घ्या.

२. उकडीसाठी एका पातेल्यात पावणेचार कप पाणी घ्या. टीप – पाणी नेहमी पिठापेक्षा थोडं कमी घ्यावं.
३. पाण्यात चिमूटभर मीठ आणि लोणी / साजूक तूप घालून पाणी उकळा. टीप – लोणी घातलं तर उकड छान मऊ होते.
४. पाणी उकळलं की त्यात मोदकाचं पीठ घालून लगेच झाकण ठेवून २ मिनिटं वाफवा. गॅस बंद करून पीठ झाकून ठेवा.
५. १० मिनिटांनी उकड गरम असतानाच छान मळून घ्या. टीप – हाताला गरम लागू नये म्हणून वाटीच्या उलट्या बाजूला तेल लावून वाटीनं उकड मळा.
६. मळताना हात पाण्यात बुडवून घ्या. जरूर असेल तरच तेल घाला . टीप – जास्त तेल घातलं तर मोदकांना भेगा पडतात. आणि उकड जास्त मऊ झाली तर मोदक वळताना कठीण पडतो. आणि मोदक वाफवल्यावर कळ्या सपाट होतात.
७. उकड किती मळायची हे अनुभवानं कळतं. टीप – उकडीचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पारी बनवा. पारी कडेला एकसंध राहिली की उकड बरोबर मळली गेलीय असं समजावं.


८. उकडीचा छोटा गोळा घ्या. आणि हाताची बोटं वापरून त्याची पारी बनवा – जेवढी पातळ बनवता येईल तेवढी. टीप – पारी बनवताना वरून खाली बनवत यायची. म्हणजे पारी छान वाटी सारखी होते नाहीतर पारी सपाट होईल.
९.पारीत १ चमचा सारण घाला. पारीला हलक्या हाताने कळ्या काढा– जेव्हढ्या येतील तेव्हढ्या.



१०. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप – कळ्या एकत्र करून मोदकाला नाक बनवा. टीप – अंगठा आणि पहिलं बोट वापरून कळ्या एकत्र करा. त्यावेळी हाताचा पंजा पोकळ असला पाहिजे म्हणजे मोदक चेपणार नाही.
११. मोदकाचं नाक जास्त जाड असेल तर थोडी उकड काढून टाकून ते सुबक करा.


१२. तयार मोदक ओल्या फडक्याखाली ठेवा म्हणजे सुकणार नाही.
१३. मोदक पात्रात / पातेल्यात पाणी उकळा. मोदक वाफवायच्या ताटलीत पातळ कपडा ओला करून पसरवा.
१४. प्रत्येक मोदकाचा बेस (बूड) पाण्यात बुडवून ताटलीत ठेवा.
१५. पाणी उकळलं की ताटली मोदक पात्रात / पातेल्यात ठेवून वाफवून घ्या. मध्यम आचेवर २०–२५ मिनिटं लागतात.
१६. साजूक तुपाबरोबर खायला द्या.
Fabulous small tips are going to help in a great manner, thank you so much for describing so nicely.
Hope it helped you in making Modak Alka.
Sudha