Methi Laadoo (मेथीचे पौष्टिक लाडू) – Fenugreek Seeds Laddu – No Refined Sugar
Methi Laadoo is a winter specialty. Because of the nutritional value of Methi (Fenugreek Seeds) it is recommended to have some form of Methi in regular diet. Methi Laadoo is one such delicious option. These laddus are little bitter but they are delicious. If you want Laddus to be less bitter, reduce the amount of Fenugreek Powder in the recipe.
There are different ways to make these laddus. In some recipes Fenugreek Powder is soaked in Hot Ghee for 12 hours and then roasted. I directly roast Fenugreek Powder in Ghee. I have not noticed any difference in taste of Laddus using these two methods. This recipe does not use Refined Sugar.
Ingredients (Makes 25-26 laddus) (1 cup = 250 ml)
Methi (Fenugreek) Seeds Powder ½ cup
Wheat Flour 1 cup
Sunth (Dry Ginger / Saunth) Powder 2 teaspoon
Aliv (Garden Cress Seeds / Haliv / Halim) 1 tablespoon (optional)
Dink (Gond / Gunder / Edible Gum) 2 tablespoon
Crushed Jaggery 1 cup (add more if you don’t want bitter laddus)
Dry Dates (Kharik) Powder ¾ cup
Grated Dry Coconut 1 tablespoon
Khaskhas (Poppy Seeds) 1 tablespoon
Badam (Almonds) chopped to thin slices 8-10
Pure Ghee (Clarified Butter) 1 cup (approx)
Honey 1-2 tablespoon
Instructions
1. Dry roast grated dry coconut till light brown and transfer to a big bowl.
2. Dry roast Poppy Seeds till light brown and transfer to a plate. Upon cooling, grind it and transfer to the bowl.
3. Dry roast Aliv for 2-3 minutes and transfer to the bowl.
4. Add 1 tablespoon of Ghee to the pan and roast Methi powder till it changes its colour. Transfer to the bowl.
5. Add ½ teaspoon of ghee to the pan and roast Sunth Powder for 2 minutes. Transfer to the bowl.
6. Add ½ tablespoon of ghee to the pan and roast Dry Dates Powder for 2 minutes. Transfer to the bowl.
7. Add 2 tablespoon of Ghee to a pan. Heat it on low flame. Add Edible gum and fry it till it is puffed. Take it out in a plate. Leave it to cool.
8. In the same pan in which you fried the edible gum, fry Almonds pieces till light brown. Add little Ghee if required. Transfer to the bowl that has other roasted ingredients.
9. Add 3 tablespoon of ghee to the pan and roast wheat flour till it is light brown and you get aroma of roasted flour. Add more ghee as required.
10. Transfer the flour to the bowl.
11. Crush the puffed edible gum with hands and add it to the bowl. Mix all the ingredients.
12. Heat Jaggery in a pan till it melts and then add to the mixture and mix it.
13. Add Honey and mix.
14. Roll laddus while the mixture is warm. If it’s difficult to roll laddus, add a spoonful of Ghee to the mixture; mix it and then roll laddus.
15. Delicious and Healthy Methi Laddu are ready. Serve them along with breakfast or as mid morning or evening snack.
Note
- If Fenugreek Seeds Powder is not available, you can roast Fenugreek seeds and grind into a fine powder.
===================================================================================
मेथीचे पौष्टिक लाडू
मेथीचे लाडू खूप पौष्टिक असतात पण जरा कडू असल्यामुळे सगळ्यांना आवडतातच असे नाही. गूळ, खारीक, मध घालून कडवट चव कमी केली तरी लाडू खाल्ल्यावर थोडी कडसर चव जिभेवर राहतेच.
मेथीचे लाडू करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जणी मेथी पावडर १०–१२ तास गरम तुपात भिजवून ठेवतात आणि नंतर ती जरा परतून घेतात. मी मेथीची पावडर न भिजवता तुपावर परतून घेते. मला दोन्ही पद्धतीत लाडवाच्या चवीत काही फरक जाणवला नाही.
मला थोडे कडसर लाडू आवडतात. तुम्हाला अगदी कमी कडवट चव हवी असेल तर मेथी पावडर कमी घाला.
रेसिपी सोपी आहे पण बरेच जिन्नस असल्यामुळे लाडू करायला जरा वेळ लागतो.
साहित्य (२५–२६ लाडवांसाठी) (१ कप = २५० मिली )
मेथी पावडर अर्धा कप
गव्हाचं पीठ १ कप
सुंठ पावडर २ टेबलस्पून
अळीव / हळीव १ टेबलस्पून (ऐच्छिक)
डिंक २ टेबलस्पून
चिरलेला गूळ १ कप (लाडू आणखी गोड हवे असतील तर जास्त घाला)
खारीक पावडर पाऊण कप
किसलेलं सुकं खोबरं १ टेबलस्पून
खसखस १ टेबलस्पून
बदाम ८–१० बारीक काप / तुकडे करून
साजूक तूप अंदाजे १ कप
मध १–२ टेबलस्पून (ऐच्छिक)
कृती
१. एका कढईत सुकं खोबरं तूप न घालता लालसर रंगावर भाजून घ्या. एका वाडग्यात काढा.
२. खसखस खमंग भाजून घ्या. एका ताटलीत काढून गार करा. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून वाडग्यात काढा.
३. अळीव २–३ भाजून वाडग्यात काढा.
४. एक टेबलस्पून तूप घालून त्यात मेथी पावडर घालून रंग बदलेपर्यंत भाजून घ्या. वाडग्यात काढा.
५. अर्धा चमचा तूप घालून त्यात सुंठ पावडर घालून २ मिनिटं भाजा. वाडग्यात काढा.
६. अर्धा टेबलस्पून तूप घालून खारीक पावडर घालून २ मिनिटं भाजून वाडग्यात काढा.
७. २ टेबलस्पून तूप घालून डिंक घालून तळून घ्या. वेगळ्या ताटलीत काढा.
८. त्याच तुपात बदामाचे तुकडे तळून घ्या आणि वाडग्यात काढा.
९. ३ टेबलस्पून तूप घालून त्यात गव्हाचं पीठ खमंग भाजून घ्या. जरूर पडल्यास आणखी थोडं तूप घाला. भाजलेलं पीठ वाडग्यात काढा.
१०. तळलेला डिंक हाताने कुस्करून थोडा बारीक करा आणि वाडग्यात घाला.
११. कढईत गूळ वितळवून घ्या आणि वाडग्यात घाला.
१२. मध घालून मिक्स करा.
१३. मिश्रण कोमट असताना लाडू वळा. लाडू वळले नसतील तर मिश्रणात चमचाभर तूप घालून मिक्स करा आणि नंतर लाडू वळा.
१४. मेथीचे स्वादिष्ट लाडू तयार आहेत. सकाळी ब्रेकफास्ट ला किंवा संध्याकाळी नाश्त्याला खायला द्या.
टीप
१. मेथीची पावडर उपलब्ध नसेल तर मेथीचे दाणे भाजून मिक्सर मध्ये पावडर करू शकता.
thank you Sudha Tai ..khup chan recipe aahe.
Thank you
कॅनदातल्या थंडीमध्ये मी ही रेसिपी वापरून बनवलेले लाडू खूप छान झालेत. सुधा, तुला खूप खूप धन्यवाद!
Thank you Sunanda
तू माझ्याकडे आली होतीस तेव्हा हेच लाडू होते घरी
Perfect seasonal healthy laddus, my favourite ,feel like to grab all methi laddus from plate
Thank you Renu. I also like these bitter laddus