Khamang Chivada / Roasted Thick Poha Chivada (फुलवलेल्या पोह्यांचा – भाजक्या पोह्यांचा खमंग चिवडा)

Khamang Chivada / Roasted Thick Poha Chivada (फुलवलेल्या पोह्यांचा - दगडी पोह्यांचा खमंग चिवडा)

Khamang Chivada / Roasted Thick Poha Chivada (फुलवलेल्या पोह्यांचा – भाजक्या पोह्यांचा खमंग चिवडा)

फुलवलेल्या पोह्यांचा – भाजक्या पोह्यांचा खमंग चिवडा मराठी

This Chivada is made using Thick Poha (Flattened Rice) that is pre-roasted. These Roasted Poha (फुलवलेले पोहे / सेकेला पोहा / दगडी पोहे / भाजके पोहे ) are available in grocery store. Since Poha are already roasted there is no need to roast them again. This Chivada is very tasty. I’ve used Ginger Garlic paste in this. You can skip it if you don’t like it or add only Ginger paste.

Ingredients (Makes about 1 kg of Chivada)

Roasted Thick Poha ½ kilogram

Raw Peanuts 200 grams

Dalia / Roasted Chana Daal (Roasted Split Bengal Gram) 50 grams

Dried Coconut 100 grams

Green Chilies+Garlic+Ginger paste 4 tablespoon

Powdered sugar 2 tablespoons (optional)

Oil 100 grams (½ cup where 1 cup = 250 ml)

Mustard Seeds 1 teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida ½ teaspoon

Cashew Nut 25-30 chopped ( or as much as you like)

Raisins (Khishmis) 25 -30 ( or as much as you like)

Salt to taste

Instructions

1. Cut Dry Coconut in thin slices about 1 inch long

2. If Poha are not crispy, dry roast them on low heat till they are crispy. Spread them on a paper.

3. In a pan, add 2 tablespoon of oil and heat on low flame. Add Chilly+Ginger+Garlic Paste and Sauté till light brown and dry.

4. In a large pan, heat oil on medium flame. Add Mustard seeds, wait till sputtering stops.

5. Add Peanuts, sauté till reddish brown.

6. Add Dry Coconut slices, sauté till dark brown.

7. Add chopped Cashew Nuts and Raisins. Sauté till Raisins puff up.

8. Add Roasted Masala and mix.

9. Add Asafoetida, Turmeric Powder, Roasted Dalia, Salt and Mix.

10. Add Poha and mix well. Switch off the gas.

11. Add powdered sugar, mix well.

12. Cool to room temperature. And store in air tight container.

13. Enjoy Chivada with a hot cup of tea.

Note: When Chivada is hot, you may feel there is excess oil. But as it cools, oil gets absorbed in Poha and Chivada becomes non oily.

Khamang Chivada / Roasted Thick Poha Chivada (फुलवलेल्या पोह्यांचा – दगडी पोह्यांचा खमंग चिवडा)

==================================================================================

फुलवलेल्या पोह्यांचा – भाजक्या पोह्यांचा खमंग चिवडा

पातळ पोह्यांचा चिवडा खूप लोकप्रिय आहे. जाड पोह्यांचा ही चिवडा करतात. पण पोहे तळून बनवलेला चिवडा खूप तेलकट असतो. त्यापेक्षा फुलवलेल्या पोह्यांचा (भाजके पोहे ) चिवडा कमी तेलात होतो आणि चवीलाही छान लागतो. अर्थात पातळ पोह्यांच्या चिवड्यापेक्षा जास्त तेल लागते. फुलवलेले पोहे (भाजके पोहे) किराणा दुकानात किंवा चणेवाल्याकडे मिळतात. मी ह्या चिवड्यात हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट घालते. तुम्हाला आवडत नसेल तर लसूण / आलं घालू नका

टिप्स मी पातळ पोह्यांच्या चिवड्यासाठी दिलेल्या आहेत तशाच ह्या चिवड्यासाठी ही

आणखी २ टिप्स ह्या चिवड्यासाठी :

. आलं, लसूण, मिरचीचं वाटण तेलामध्ये अगदी सुकं होईपर्यंत परता नाहीतर चिवडा मऊ पडेल.

. चिवडा गरम असताना तेल जास्त झालंय असं वाटेल पण गार झाल्यावर तेल पोह्यांमध्ये शोषलं जातं आणि चिवडा अजिबात तेलकट होत नाही

साहित्य (अंदाजे १ किलो चिवड्यासाठी)

फुलवलेले पोहे / भाजके पोहे अर्धा किलो

कच्चे शेंगदाणे २०० ग्राम

खोबरे १०० ग्राम पातळ काप करून

डाळं ५० ग्राम

हिरव्या मिरच्या, आलं, लसूण पेस्ट ४ टेबलस्पून 

पिठीसाखर २ टेबलस्पून (ऐच्छिक पण घातली तर चिवडा टेस्टी होतो)

तेल १०० ग्राम (अर्धा कप (१ कप = २५० मिली))

मोहरी १ चमचा

हळद अर्धा चमचा

हिंग अर्धा चमचा

काजू २५३० तुकडे करून (हवे तेवढे घाला )

बेदाणे (किसमिस) २५३० (हवे तेवढे घाला )

मीठ चवीनुसार

कृती

. पोहे कुरकुरीत नसतील तर मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या, तेल घालू नका आणि कागदावर पसरून ठेवा

. एका कढईत २ टेबलस्पून तेल घालून मिरच्या, आलं, लसणीची पेस्ट घाला. मंद आचेवर पेस्ट सुकी होईपर्यंत परता. ताटलीत काढून ठेवा.

. पातेल्यात तेल घालून मध्यम गॅस करून तेल तापवा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडू द्या .

. आता शेंगदाणे घाला. शेंगदाणे तपकिरी झाले की खोबऱ्याचे तुकडे घाला. मधे मधे ढवळत राहा.

. खोबरे तपकिरी झाले की काजूचे तुकडे आणि बेदाणे घाला. मधे मधे ढवळत राहा.

. बेदाणे फुलून आले की त्यात भाजलेल्या मसाला घालून चांगलं मिक्स करा. आता हिंग, हळद, डाळं आणि मीठ घालून मिक्स करा

. थोडे थोडे पोहे घालून मिक्स करा. आणि गॅस बंद करा.

. पिठीसाखर घालून मिक्स करा. चव घेऊन मीठ, साखर हवी असेल तर घाला आणि मिक्स करा.

. टेस्टी चिवडा तयार आहे.

१०. गार झाल्यावर हवाबंद बरणी / डब्यात भरून ठेवाचिवडा १५२० दिवस टिकतो (पण बहुतेक वेळा त्याआधीच संपतो).

Khamang Chivada / Roasted Thick Poha Chivada (फुलवलेल्या पोह्यांचा – दगडी पोह्यांचा खमंग चिवडा)

2 Comments

  1. तुमच्या वरील रेसिपीप्रमाणे चिवडा केला .छान झाला. धन्यवाद

Your comments / feedback will help improve the recipes