Gajar Halwa (गाजर हलवा) – Carrot Halwa

Gajar Halwa (गाजर हलवा) - Carrot Halwa

Gajar Halwa (गाजर हलवा) – Carrot Halwa

गाजर हलवा मराठी

This is all time favorite sweet dish. Also probably the only sweet Bollywood Moms make for their sons. Once you get the Carrots grated, it’s very easy to make. There are different recipes of making Gajar Halwa. This is my mother’s recipe that makes delicious Gajar Halwa without using much Ghee (Clarified butter). It uses Mava (Milk Solids) for the rich and creamy taste.

Ingredients

Carrots 1 kg

Sugar about 200 gms

Milk Solids (Mava / Khoya) 200 gms

Cashew Nuts 20-25

Cardamom Powder ¼ teaspoon

Salt a pinch

Desi Ghee (Clarified Butter) 1 Tablespoon

Milk about ½ cup

Instructions

1. Wash, Peel and grate Carrots.

2. In a thick bottom pan, heat ghee.

3. Measure grated Carrots using cup / bowl and add to ghee and sauté for 2 minutes.

4. Cook covered without adding water till carrot is soft. Keep stirring after every 3-4 minutes.

5. Add Milk just enough to cover the carrots. Cook for another 10 minutes.

6. If you have 4 cups of grated carrots, take ¾ to 1 cup of sugar. Add sugar to Carrots. Mix and cook without lid.

7. Mixture will release water. When you cook further, it will start thickening.

8. Loosen Mava (Milk solids) in a plate. When there is very little water in the mixture , add Mava to the pan. Mix well to ensure there are no lumps of Mava.

9. Add salt (I add salt in almost all sweet dishes except Basundi/Rabdi, it enhances the taste; If you don’t like salt, don’t add)

10. Add Cashew nuts; Keep cooking.

11. When all the water evaporates and Halwa becomes thick, add cardamom power; mix and switch off the gas.

12. Delicious Gajar Halwa is ready. You can enjoy Gajar Halwa hot or cold. It lasts for 5-6 days when stored in the refrigerator. Before serving heat it in a microwave if you like it hot.

Gajar Halwa (गाजर हलवा) – Carrot Halwa
Gajar Halwa (गाजर हलवा) – Carrot Halwa

===================================================================================

गाजर हलवा

सगळ्यांचा आवडता गाजर हलवा. आणि हो !

हिंदी सिनेमात माँतिच्या लाडल्या बेट्यासाठी कौतुकाने बनाती हैतो गाजर का हलवा‘!! मला आश्चर्य वाटतं कि ह्या आया (आई चं बहुवचन) गाजर हलवाच का बनवतात”? इतर कुठलाही गोड पदार्थ का करत नाहीत? कदाचित गाजर हलव्यासारखी सोपी गोष्टच तिला जमत असावी. असो.

सोपा पदार्थ आहे पण अतिशय स्वादिष्ट लागतो. हिवाळ्यात लाल रंगाची गाजरं मिळतात तेव्हा करायचाच असतो ३४ वेळा !! प्रत्येकाची रेसिपी थोडी वेगळी असते. ही माझ्या आई ची रेसिपी आहे. ह्यात तूप अगदी कमी आहे. गाजरं दुधात शिजवून नंतर मावा घातला आहे.

मी हलव्यात घरी केलेला खवा / मावा घालते. १ किलो गाजरं असतील तर पाऊण लिटर म्हशीच्या दुधाचा मावा लागतो. मावा करायला फार कष्ट पडत नाहीत. बाकीची कामं करता करता एकीकडे मावा होऊन जातोघरी केलेल्या माव्यामुळे हलवा जास्तच स्वादिष्ट होतो. मी हलवा मंद गॅसवर शिजवते. प्रेशर कुकर मध्ये शिजवून हलव्याची चव बदलते असं माझं मत आहे.
गाजरं किसून घेणे ही  एकच वेळखाऊ गोष्ट. बाकी अगदी सोपी कृती.

साहित्य

गाजरं १ किलो

साखर अंदाजे २०० ग्राम

मावा २०० ग्राम

दूध अंदाजे अर्धा कप

काजू २०२५

साजूक तूप १ टेबलस्पून

वेलची पूड पाव टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. गाजर धुवून सालं काढून किसून घ्या.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात साजूक तूप गरम करून त्यात गाजराचा कीस मोजून घाला.

. २मिनिटं परता. झाकण ठेवून पाणी न घालता मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. मधे मधे ढवळत राहा

. आता त्यात गाजराचा कीस बुडेपर्यंत दूध घाला. १० मिनिटं शिजवा.

. गाजराचा कीस ४ कप  असेल तर पाऊण / एक कप साखर मोजून घ्या. आणि पातेल्यात घाला.

. झाकण न ठेवता शिजवा. आधी मिश्रणाला पाणी सुटेल. आणि शिजवत राहिल्यावर मिश्रण घट्ट व्हायला लागेल.

. मावा मोकळा करा आणि मिश्रणात घालून नीट ढवळा. गुठळ्या असतील तर चमच्याने मोडून घ्या.

. मिश्रण शिजवत राहा. मीठ घाला. काजूचे तुकडे घाला. हवं तेव्हढं घट्ट झाल्यावर वेलची पूड घालून गॅस बंद करास्वादिष्ट गाजर हलवा तयार आहे

. गाजर हलवा गरम किंवा गार कसाही खाऊ शकता.

१०. फ्रिज मध्ये ठेवून हलवा ५६ दिवस टिकतो. खायला देताना मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून देऊ शकता.

Gajar Halwa (गाजर हलवा) – Carrot Halwa
Gajar Halwa (गाजर हलवा) – Carrot Halwa

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes