Kanakecha Halwa / Atte Ka Halwa (कणकेचा हलवा / आटे का हलवा) – Wheat Pudding
कणकेचा हलवा / आटे का हलवा मराठी
Atte ka Halwa / Atte ka Shira is a popular sweet from Northen India. It can be served for breakfast or as a dessert. It’s made from Whole Wheat Flour, Sugar and Ghee (Clarified Butter). It’s an easy recipe that makes super delicious Halwa.
Ingredients (Serves 10) (1 cup = 250 ml)
Wheat Flour 1 cup
Sugar 1 cup
Pure Ghee (Clarified Butter) 1 cup
Cardamom Powder ¼ teaspoon
Dry Fruits of your choice chopped into small pieces 2 tablespoon
Salt 2 pinch (Optional)
Instructions
1. In a pan, heat ½ cup Ghee on low flame.
2. Add Wheat Flour and Roast on low flame till you get nice aroma of roasted flour. This is the most important step in the recipe. If flour is under-roasted, Halwa will have a taste of raw flour.
3. Simultaneously, In another bowl, add 3 cups of water and 1 cup of sugar. Bring the mixture to boil.
4. Pour sugar mixture into wheat flour; mix quickly to ensure there are no lumps. If there are lumps, break them using a spatula. Ensure gas flame is low.
5. Cook for 3-4 minutes. Mixture will be like a smooth paste.
6. Add remaining Ghee and mix.
7. Add cardamom powder, salt and dry fruits. Mix.
8. Delicious Atte ka Halwa is ready. Serve hot.
9. If you want to store it for more than a day, keep it is the refrigerator. Before serving warm it in a microwave.
Note
1. If you use coarse wheat flour for this Halwa, the texture of Halwa is better. But if that is not available, you can use the regular flour. Halwa comes out very well with that flour also.
===================================================================================
कणकेचा हलवा (गव्हाच्या पिठाचा हलवा) – आटे का हलवा
कणकेचा हलवा (आटे का हलवा / आटे का शिरा) हा उत्तर भारतातला लोकप्रिय गोड पदार्थ आहे. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्याला किंवा जेवणानंतर स्वीट डिश म्हणून खाल्ला जातो. गव्हाचं पीठ, साखर आणि साजूक तूप एवढेच जिन्नस वापरून केलेला हा पदार्थ अतिशय स्वादिष्ट लागतो. अगदी सोपी रेसिपी आहे. गव्हाचं जाडसर पीठ वापरलं तर हलव्याचं टेक्सचर छान येतं. पण ते नसेल तर नेहमीचं पीठ वापरलं तरी हलवा छान होतो.
गुरुद्वारामध्ये हा हलवा ‘कडा प्रसाद‘ म्हणून दिला जातो. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दिला जाणारा ‘कडा प्रसाद‘ अतिशय अप्रतिम असतो. तिथे गव्हाचं जाडसर पीठ वापरून हलवा करतात.
साहित्य (१० जणांसाठी) (१ कप = २५० मिली )
गव्हाचं पीठ १ कप
साखर १ कप
साजूक तूप १ कप
वेलची पूड पाव चमचा
सुका मेवा आवडीनुसार बारीक तुकडे करून
मीठ २ चिमूट (ऐच्छिक)
कृती
१. एका कढईत अर्धा कप तूप घालून त्यात गव्हाचं पीठ घाला. मंद गॅसवर खमंग भाजून घ्या . ह्या रेसिपीत ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. पीठ कमी भाजलं तर हलव्याला कच्च्या पिठाची चव येते.
२. दुसऱ्या पातेल्यात साखर आणि ३ कप पाणी घाला आणि साखरेचं पाणी उकळून घ्या.
३. साखरेचं पाणी पिठात घाला आणि लगेच नीट ढवळून घ्या. गॅस बारीकच ठेवा. गुठळ्या मोडून घ्या.
४. २–३ मिनिटं शिजवा. मिश्रण पेस्ट सारखं दिसायला लागेल.
५. उरलेलं तूप घालून मिक्स करा.
६. वेलची पूड, मीठ आणि सुका मेवा घालून मिक्स करा.
७. कणकेचा स्वादिष्ट हलवा तयार आहे. गरमागरम हलवा खायला द्या.
८. एका दिवसापेक्षा जास्त दिवस ठेवायचा असेल तर फ्रिज मध्ये ठेवा. आणि खायला द्यायच्या आधी मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घ्या.
टीप
१. गव्हाचं जाडसर पीठ वापरलं तर हलव्याचं टेक्सचर छान येतं. पण ते नसेल तर नेहमीचं पीठ वापरलं तरी हलवा छान होतो.
Your comments / feedback will help improve the recipes