Palak Soup (पालक सूप) – Cream of Spinach Soup

Palak Soup (पालक सूप) - Cream of Spinach Soup

Palak Soup (पालक सूप) – Cream of Spinach Soup

पालक सूप मराठी

Healthy and Tasty soup using Spinach. Iron, fibre rich colourful Soup is Good for any season. An easy recipe to make a delicious soup. I cook Spinach in Microwave, it retains the green colour. If you don’t want to use microwave, cook spinach in a pan without lid. The colour of Spinach will change a bit.

Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)

Chopped Spinach Leaves 1 cup

Butter / Ghee / Clarified Butter ½ teaspoon

Corn Flour (Corn Starch) ½ teaspoon

Milk 2 tablespoons

Sugar 1 teaspoon

Black Pepper Powder to taste

Salt to taste

Fresh Cream for Garnishing

Instructions

1. Wash, clean and chop Spinach leaves. Add tender stems, if any. Cook in microwave for 4 minutes on high power without lid. If you don’t have Microwave, cook on high flame in a pan without lid and after adding 2 tablespoon water. Cook till Spinach is tender.

2. When cool, blend cooked leaves in a smooth Puree.

3. Heat Butter/ Clarified Butter / Ghee in a deep pan on low flame.

4. Add corn starch and saute for a minute.

5. Add milk and stir well to ensure no lumps are formed. Bring milk to boil; add ½ cup water; bring to boil.

6. Add Spinach Puree, Sugar, Salt. Add water to get required consistency.

7. Boil for 7-8 minutes.

8. Add Black Pepper. Mix well.

9. Delicious and healthy Cream of Spinach soup is ready. Garnish with Fresh Cream and Serve Hot.

Palak Soup (पालक सूप) – Cream of Spinach Soup
        ==================================================================================

पालक सूप

पौष्टिक आणि टेस्टी पालक सूप कधीही खायला छान लागत. थंडीत / पावसाच्या दिवसात तर गरम गरम सूप खायला मजाच येते. पालकात  लोह आणि जीवनसत्व भरपूर असतात. ही अगदी सोपी रेसिपी आहे आणि नेहमीप्रमाणे खूप कमी जिन्नस वापरून केलेली आहे. मी पालक मायक्रोवेव्ह मध्ये शिजवून घेते. त्यामुळे त्याचा रंग हिरवागार राहतो. तुम्ही कढईत शिजवू शकता.

साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

चिरलेला पालक १ कप

बटर / साजूक तूप अर्धा चमचा

कॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) अर्धा चमचा

दूध २ टेबलस्पून

साखर १ चमचा

काळी मिरी पावडर चवीनुसार

मीठ चवीनुसार

साय सजावटीसाठी

कृती

. पालक निवडून धुवून घ्या आणि बारीक चिरून घ्या. पालकचे कोवळे देठ असतील तर तेही चिरून घ्या.

. मायक्रोवेव्ह च्या भांड्यात चिरलेला पालक आणि देठ घाला. पाणी न घालता हाय पॉवर वर ४ मिनिटं शिजवा. झाकण ठेवू नका. मायक्रोवेव्ह वापरायचा नसेल तर चिरलेला पालक, देठ एका कढईत घाला. २ टेबलस्पून पाणी घाला. मोठ्या आचेवर झाकण न ठेवता पालक नरम होईपर्यंत शिजवून घ्या.

. शिजलेला पालक, देठ गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

. एका पातेल्यात बटर / साजूक तूप गरम करून त्यात कॉर्न फ्लोअर घाला. मंद आचेवर रंग बदलेपर्यंत परतून घ्या. त्यात दूध घालून एकसारखं ढवळत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. दूध उकळलं की अर्धा कप पाणी घालून उकळी काढा.

. वाटलेला पालक पातेल्यात घाला. मीठ, साखर घाला. पाणी घालून सूप जेवढं पातळ हवं तेवढं करा.

. मिश्रण ७८ मिनिटं उकळू द्या.

. मिरी पावडर घाला. ढवळून घ्या.

१०. स्वादिष्ट आणि पौष्टिक पालक सूप तयार आहे. फेटलेली साय घालून गरम सुपाचा आस्वाद घ्या

Palak Soup (पालक सूप) – Cream of Spinach Soup

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes