Tondlyachi Koshimbir (तोंडल्याची कोशिंबीर/ तेंडली रायता) – Ivy Gourd / Scarlet Gourd Salad

Tondlyachi Koshimbir (तोंडल्याची कोशिंबीर/ तेंडली रायता)

Tondlyachi Koshimbir (तोंडल्याची कोशिंबीर/ तेंडली रायता) – Ivy Gourd / Scarlet Gourd Salad

तोंडल्याची कोशिंबीर मराठी

This is a Maharashtrian recipe that uses steamed Tondli / Tendli and curd to make this tasty side dish. It’s a very easy recipe and requires very few ingredients. My Grandmother used to make it. She would pressure cook a few Tondli along with Rice and mix other ingredients to make a yummy Koshimbir. But I always wondered why this was not made in sufficient quantity so that everyone can have it generously. Now that everyone at home likes it, I make this Koshimbir in good quantity sufficient for everyone. Generally who don’t like Tondli will also like this Koshimbir.

Ingredients (Serves 2) (1 cup = 250 ml)

Tender Tondli (Ivy Gourd / Tendli) 25-30

Plain Yogurt (Dahi / Curd) about ¼ cup (Naturally sweet)

Sugar ½ teaspoon

Crushed Green Chilies ½ teaspoon

Fresh Scraped Coconut 1 teaspoon

Chopped Coriander 1 teaspoon

Salt to taste

For Tempering / Tadka

Pure Ghee (Clarified Butter) ½ tablespoon

Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Instructions

1. Wash Tondli; Discard both ends; Chop each Tondli into 4 pieces.

Chopped Tondli (चिरलेली तोंडली)

2. Pressure cook chopped Tondli.

3. While warm, mash the steamed Tondli into a rough mixture. Don’t make a smooth paste.

4. Add Green chilies, salt, sugar, scraped coconut and chopped coriander leaves.

5. Mix well. Add Curd. Mix.

4. For Tempering, heat pure ghee in a ladle on medium flame.

5. Add cumin seeds (Jeera), wait till splutters.

6. Add Asafoetida (hing).

7. Pour this tempering over the Tondli mixture. Mix well.

8. Enjoy Tasty Koshimbir with Roti, Rice or as it is.

Note

1. Instead of using raw green chili, if you roast it on gas and add this after crushing, it gives a nice taste to Koshimbir.

Tondlyachi Koshimbir (तोंडल्याची कोशिंबीर/ तेंडली रायता)
Tondlyachi Koshimbir (तोंडल्याची कोशिंबीर/ तेंडली रायता)
     ==================================================================================

तोंडल्याची कोशिंबीर

तोंडल्याची कोशिंबीर ही फारशी प्रचलित नसलेली महाराष्ट्रीयन कोशिंबीर आहे. करायला अगदी सोपी, अगदी मोजकं साहित्य आणि खूप चविष्ट असं हे तोंडीलावणं हल्लीच्या पिढीला माहितही नसेल. माझी आजी ही कोशिंबीर करायची. भाताचा कुकर लावताना त्यात ८१० तोंडली शिजवायची. आणि बाकीचे जिन्नस घालून चविष्ट कोशिंबीर करायची. मला मात्र नेहमी प्रश्न पडायचा की ही कोशिंबीर थोडीच का करतात? भाजीच्या ऐवजी खायला पण आवडायची मला!! आता मात्र घरी सगळ्यांना ही कोशिंबीर आवडते त्यामुळे मी जास्तच करते.

साहित्य (२ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )

कोवळी तोंडली २५३०

गोड दही अंदाजे पाव कप

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा

साखर अर्धा चमचा

ताजा खवलेला नारळ १ चमचा

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

साजूक तूप अर्धा चमचा

जिरं पाव चमचा

हिंग चिमूटभर

कृती

तोंडली धुवून घ्या. दोन्ही बाजूची देठं काढून टाका. प्रत्येक तोंडल्याचे ४ उभे तुकडे करा.

Chopped Tondli (चिरलेली तोंडली)

. प्रेशर कूकरमध्ये तोंडली शिजवून घ्या.

. कोमट असताना तोंडली जाडसर कुस्करून घ्या. अगदी पीठ करू नका.

. फोडणीसाठीचं साहित्य वगळून सर्व साहित्य घालून मिश्रण एकत्र करून घ्या.

. एका कढल्यात साजूक तूप गरम करून जिरं आणि हिंगाची खमंग फोडणी करून घ्या आणि फोडणी तयार कोशिंबिरीवर ओता. एकजीव करा.

. तोंडल्याची चविष्ट कोशिंबीर तयार आहे. पोळी, भाजीसोबत खायला द्या किंवा अशीच खा. खूप छान लागते.

टीप

. हिरवी मिरची कच्ची घालण्यापेक्षा गॅसवर भाजून ठेचून घातली तर कोशिंबीर आणखी छान लागते

Tondlyachi Koshimbir (तोंडल्याची कोशिंबीर/ तेंडली रायता)
Tondlyachi Koshimbir (तोंडल्याची कोशिंबीर/ तेंडली रायता)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes