Tips for Making Perfect Besan Laadoo (परफेक्ट बेसन लाडू करण्यासाठी टिप्स)

Besan Laadoo (बेसन लाडू)

Tips for Making Perfect Besan Laadoo (परफेक्ट बेसन लाडू करण्यासाठी टिप्स)

परफेक्ट बेसन लाडू करण्यासाठी टिप्स मराठी

Besan laadoo is an all time favorite sweet dish. There are different ways to make Laadoos. Typical Maharashtrian way is to make them with little milk. I always follow this recipe. It’s fairly easy but time consuming. But the end product is awesome. Worth all the time you spent in roasting Besan. Alternatively you can roast Besan in Microwave on High Mode. Use a Microwave safe Glass bowl. Add Besan and Ghee and roast for 3 minutes; stir the mixture; again roast for 3 minutes. Repeat this process till Besan is properly roasted, colour changes to brown and you get nice aroma of roasted Besan. After this follow other steps of Besan Laadoo.

1. Texture of Besan (Gram Flour) – Coarse gram flour makes delicious Besan Laddus. But if you use fine Gram flour, you need to reduce the quantity of Ghee (clarified butter).

2. Proportion of Ghee is most important for Besan Laddus. If you use too much Ghee, Laddus will lose the shape. At the same time, Ghee should not be too less to make Laddus dry. New home cooks should first try with a smaller quantity so that they can understand Ghee proportion. If you want add more Ghee as per your liking.

3. Do not use whole stock of Gram Flour and Ghee when you make Besan Laddus. So that you don’t need to run to the shop in can you need to Repair the laddus.

4. It is best to use home made Ghee for these laddus. But in case you want to use Vanaspati Ghee (Thick vegetable oil), then check it before use. If it has little foul smell, do not use that pack. Buy a fresh pack and use it.

5. Use freshly ground sugar for Laddus. If you already have a stock of Ground sugar, grind it again in the grinder to break any lumps. Or if possible, use Bura sugar that is available in India. This is made by dehydrating sugar syrup. There are no lumps in Bura sugar.

Besan Laadoo
Besan Laadoo (बेसन लाडू)

 

 

 

 

 

 

 

For Recipe of Besan Laadoo, click here:

Besan Laadoo (बेसन लाडू ) – Besan Laddu – Gram Flour Sweet Balls

==================================================================================

परफेक्ट बेसन लाडू करण्यासाठी टिप्स

सगळ्यांचे आवडते बेसन लाडू बनवायला तसे सोपे असतात. मुख्य म्हणजे पाक करायला लागत नाही. पण जरा वेळखाऊ पदार्थ आहे; बेसन भाजायला बराच वेळ लागतो.

लाडवांसाठी बेसन भाजणे हे एक कंटाळवाणं काम असतं. आणि ते करताना दुसरं काही  करता येत नाही. यासाठी मायक्रोवेव्ह मध्ये बेसन भाजणे हा एक चांगला पर्याय आहे. मायक्रोवेव्हच्या काचेच्या भांड्यात बेसन घाला. तूप घाला. एकदा ढवळून मायक्रोवेव्ह हाय पॉवर वर ३ मिनिटं चालू करा. नंतर बेसन बाहेर काढून ढवळून परत ३ मिनिटं भाजा. पाव किलो बेसन भाजायला ७८ मिनिटं लागतात. तुम्हाला जेवढं खमंग भाजायचं असेल तेवढं भाजून भांडं बाहेर काढून दुधाचा हबका मारून चांगलं ढवळून घ्या. आणि गार झाल्यावर पिठीसाखर मिसळून लाडू वळा. गॅसवर भाजलेल्या आणि मायक्रोवेव्ह मध्ये भाजलेल्या बेसनाच्या लाडवांच्या चवीत काही फरक नसतो. मी पहिल्यांदा मायक्रोवेव्ह मध्ये बेसन भाजून लाडू केले तेव्हा घरी सांगावं लागलं की आज वेगळ्या पद्धतीनं लाडू केलेत; तोपर्यंत कोणाला काही वेगळं जाणवलं नव्हतं.

परफेक्ट बेसन लाडू बनवण्यासाठी काही अवधानं पाळावी लागतात.

. बेसन किती बारीक आहे ? थोड्या जाडसर बेसनाचे लाडू खूप छान होतात. पण हल्ली बाजारात बेसन मिळतं ते अगदी बारीक असतं. ते लाडवांसाठी वापरलं तर तूप जाडसर बेसनापेक्षा जरा कमी घालावं लागते. बेसन बारीक असेल तर काही जणी थोडा रवा घालतात. पण त्याने लाडवांची चव बदलते असं मला वाटतं. म्हणून मी घालत नाही.

. तुपाचं प्रमाण बेसनाच्या लाडवांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बेसन लाडू फार तुपकट नसावा म्हणजे डब्यात ठेवला तर तो गोलच रहावा ; बसू नये. पण त्याचबरोबर लाडू सुकाही नसावा. म्हणून पहिल्यांदाच लाडू करून बघणाऱ्या मित्र / मैत्रिणींनी एक वाटी मापाचे लाडू बनवून बघावे म्हणजे तुपाच्या प्रमाणाचा अंदाज येईल. तुम्हाला तुपाने थबथबलेले लाडू आवडत असतील तर तूप दिलेल्या मापापेक्षा जास्त घाला

. नेहमी लाडू करताना घरातलं सगळं बेसन / सगळं तूप संपवू नये. म्हणजे जर लाडू दुरुस्त करायची वेळ आली तर दुकानात धावावं लागणार नाही.

. तूप साजूक तुपातले बेसन लाडू अप्रतिम लागतात. ते शक्य नसेल तर वनस्पती तूप वापरू शकता. पण वनस्पती तूप वापरण्याआधी त्याचा वास घेऊन बघा. कधी कधी जरा विचित्र खवट असा वास येतो. तसा आला तर ते तूप वापरू नका. वापरलं तर लाडवांना पण वास येतो. नवीन वनस्पती आणून वापरा.

. पिठी साखर ताजी मिक्सर मध्ये दळून घ्या. किंवा आधी आणलेली / केलेली पिठीसाखर परत एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्या / किंवा चाळून घ्यानाहीतर पिठीसाखरेच्या गुठळ्या मोडता मोडता हात दुखून येतात.  ‘बुरा साखरमिळत असेल तर ती वापरा ; त्याच्या गुठळ्या होत नाहीत. ‘बुरा साखऱम्हणजे साखर पाण्यात वितळवून परत त्याचे क्रिस्टल होईपर्यंत उकळवतात. हे क्रिस्टल्स म्हणजे ‘बुरा साखऱ’. दुकानात मिळते.

Besan Laadoo
Besan Laadoo (बेसन लाडू)

 

 

 

 

 

 

 

बेसन लाडू रेसिपी साठी ही लिंक क्लिक करा:

Besan Laadoo (बेसन लाडू ) – Besan Laddu – Gram Flour Sweet Balls

2 Comments

Leave a Reply to Rupali Cancel reply