Sweet Corn Coriander Fritters (मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी) – Makai Dhaniya Pakoda

Sweet Corn Coriander Fritters (मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी)
Sweet Corn Coriander Fritters (मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी)

Sweet Corn Coriander Fritters (मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी) – Makai Dhaniya Pakoda

मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी मराठी

Crispy yummy Fritters are loved by everyone in any season. These are a different type of fritters. Apart from Sweet Corn and Fresh Coriander, I add cooked rice and oats to make these Fritters more crispy. I don’t use Baking Soda in any fritters. All corn lovers will love this snack.

Ingredients (Serves 8) (1 cup=250ml)

Sweet Corn kernels 2 cups

Fresh chopped coriander 1 cup

Onion 1 medium finely chopped

Ginger crushed ½ teaspoon

Oats ½ cup

Cooked rice 1 cup

Gram Flour (Besan) 4 tablespoon (approx)

Rice flour 2 tablespoon

Chilly crushed ½ teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Turmeric Powder ¼ to ½ teaspoon

Carom seeds (Ajwain) ½ teaspoon

Salt to taste

Chat Masala ½ teaspoon

Oil to deep fry

Instructions

1. Wash and steam sweet corn in microwave on high for 4 minutes. You can steam in pressure cooker also.

2. Drain water and allow to cool.

3. Using a grinder coarsely grind steamed sweet corn.

4. In a bowl, mix all ingredients except oil. If required, add little water and mix to form a thick batter of medium consistency. Add little more Gram Flour if batter is too moist.

 

Batter for fritters (भज्यांचं पीठ )

5. In a Wok heat oil for deep frying.

6. Add 2 tablespoons of hot oil in the batter and mix.

7. Reduce gas flame to low. Carefully Drop medium size Batter chunks in hot oil and fry them on medium heat till light brown.

8. Serve hot with chutney of your choice and / or sauce.

Note

1. Instead of Carom Seeds, you can add crushed black pepper. That also tastes yummy.

2. You can use Spinach instead of coriander.

 

Sweet Corn Coriander Fritters (मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी)
Sweet Corn Coriander Fritters (मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी)

=================================================================================

मका आणि कोथिंबिरीची चटकदार भजी बेकिंग सोडा न घालता

पावसाळ्यात मक्याचे पदार्थ खायला मजा येते. आणि ती खमंग खुसखुशीत भजी असतील तर आणखीनच बहार !! ह्या मक्याच्या भज्यांमध्ये मी कोथिंबीर घालते. मी भज्यांमध्ये सोडा घालत नाही. भजी खुसखुशीत करण्यासाठी मी शिजलेला भात आणि ओट्स घालते. बेकिंग सोडा न घालता ही भजी मस्त होतात. अमेरिकन स्वीट कॉर्न (कुठेतरी ह्याचं मधुमका असं नाव वाचलं) ची किंचित गोडसर चव आणि चाट मसाल्याची चटकदार चव हे दोन्ही मिळून अफाट चव येते ह्या भज्यांना. नक्की करून बघा.

साहित्य (८ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

मक्याचे दाणे २ कप

कोथिंबीर १ कप

कांदा १ मध्यम बारीक चिरून

ठेचलेलं आलं अर्धा चमचा

ओट्स अर्धा कप

शिजवलेला भात १ कप

बेसन अंदाजे ४ टेबलस्पून

तांदुळाचं पीठ २ टेबलस्पून

ठेचलेली मिरची अर्धा टीस्पून

जिरे अर्धा टीस्पून

हळद पाव ते अर्धा टीस्पून

ओवा अर्धा टीस्पून

मीठ चवीनुसार

चाट मसाला अर्धा टीस्पून

तेल भजी तळण्यासाठी 

कृती

. मक्याचे दाणे पाणी घालून मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ४ मिनिटं शिजवून घ्या. नाहीतर प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या.

. मक्याच्या दाण्यामधलं पाणी काढून टाका आणि दाणे गार झाल्यावर मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.

. एका वाडग्यात वर दिलेलं तेल वगळून सर्व साहित्य एकत्र करा. पिठाचे गोळे करता येतील इतपत घट्ट असावे. जरूर असेल तर थोडं पाणी किंवा बेसन घाला.

Batter for fritters (भज्यांचं पीठ )

. आता कढईत भजी तळण्यासाठी तेल गरम करा.

. तयार पिठामध्ये २ टेबलस्पून गरम तेल घालून मिक्स करा.

. गॅस मंद करून पिठाचे छोटे छोटे जरा चपटे गोळे तेलात सोडा आणि फिकट तपकिरी रंगावर तळून घ्या.

. गरमागरम भजी चटणी / सॉस बरोबर सर्व्ह करा.

टीप

. ह्या भज्यांत ओव्याऐवजी काळी मिरी घालू शकता. ती चव पण छान लागते.

. ह्यात कोथिंबीरीऐवजी पालक घालून ही भजी छान होतात.

Sweet Corn Coriander Fritters (मका आणि कोथिंबिरीची चुरचुरीत भजी)
Sweet Corn Coriander Fritters (मका आणि कोथिंबिरीची चुरचुरीत भजी)

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes