Kande Pohe / Kanda Poha (कांदे पोहे) – Onion Poha (Flattened Rice)
This is an all time favorite popular Maharashtrian Snack made using Flattened Rice (Poha). It’s an easy recipe to make a yummy and healthy snack. There are different variations possible in this preparation. So you can choose to make it considering your choice of ingredients.
Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)
Flattened Rice (Poha) Thick / Basmati 2 cups
Onions 1 medium finely chopped
Potato 1 medium
Green Chillies 3-4 or Green Chilly Paste ½ teaspoon
Lemon Juice ½ teaspoon
Sugar ½ teaspoon (adjust as per taste)
Scrapped Fresh coconut 1 tablespoon
Chopped coriander 1 tablespoon
Oil 1 teaspoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ¼ to ½ teaspoon
Asafoetida a pinch
Curry Leaves 8-10
Salt to taste
Instructions
1. If you are using Thick Poha then transfer the Poha in a sieve and wash it with room temperature water. Drain away the water and keep the Poha for 10 minutes. If you are using Basmati Poha, do not wash Poha. (Basmati Poha is little thin than Thick Poha).
2. Wash Potato and cut into 4 pieces. Chop into thin slices. You can peel the potato before cutting. But I use it without peeling.
3. In a pan, heat oil on medium flame.
4. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter. Add Asafoedita, green chillies (slit lengthwise) / green chilly paste and curry leaves.
5. Add Onions and Turmeric powder. Sauté for 2-3 minutes.
6. Add potato; mix. Cook covered for 2 minutes on low flame.
7. Add 2 pinches of salt; mix. Cook covered till Potatoes are cooked.
8. If you are using thick Poha, add drained Poha to the pan. If you are using Basmati Poha, add 1 cup water in the pan and bring to boil. Add Basmati Poha in the pan. Mix.
9. Add Salt, sugar and lemon juice. Mix. Cook covered for 3-4 minutes.
10. Check the texture of Poha. If it’s too dry, sprinkle some more water and cook covered.
11. Add fresh coconut and coriander. Mix.
12. Yummy Kande Pohe / Kanda Poha is ready. Serve hot after garnishing with coconut and coriander. Don’t forget to place a lemon piece in the plate while serving.
Note
1. Texture of cooked Poha is very important. It should not be dry and it should not be soggy also. If it’s dry, sprinkle some water and cook covered for 2 minutes. If you add too much water, or don’t drain the water from washed Poha or it you use Thin Poha, it will become soggy.
2. The amount of turmeric added to Poha also makes a big difference to the look of final dish. If you add too much turmeric, Poha will become blackish. If you add less, then Poha will not be Yellow. So add Turmeric Powder after adding Onions and decide the amount of Turmeric depending on the quality of Turmeric Powder you use.
Variations
1. You can skip Potatoes in the above recipe and add only Onions. Some people call this Kanda Poha (Onion Poha) and the one in the above recipe Kanda Batata Poha (Onion Potato Poha)
2. You can skip Onions and add only Potatoes. This is called Batata Poha (Potato Poha).
3. You can skip both Onions and Potatoes. This is called Fodniche Pohe (Tempered Poha).
4. You can add any other veggies like fresh Green Peas / Carrots / Beans. Finely chop Carrots and beans. Add them to the pan in step 6 above. Cook covered till veggies are cooked. Follow the remaining steps of the recipe.
==================================================================================
कांदे पोहे
सर्वांचे आवडते कांदे पोहे हा लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. हे पोहे बनवायला अगदी सोपे आणि झटपट बनतात त्यामुळे सकाळी नाश्त्याला / संध्याकाळी चहाबरोबर खायला कधीही बनवू शकता. हे पोहे महाराष्ट्राबाहेरही लोकांना खूप आवडतात. ह्या पोह्यांमधे वेगवेगळे जिन्नस घालून तुम्ही वेगवेगळ्या चवीचे पोहे बनवू शकता.
साहित्य ( ४ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )
जाडे / बासमती पोहे २ कप
कांदा १ मध्यम बारीक चिरून
बटाटा १ मध्यम काचऱ्या कापून
हिरव्या मिरच्या ३–४ / ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
लिंबाचा रस अर्धा चमचा
साखर अर्धा चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा)
तेल १ चमचा
मोहरी पाव चमचा
जिरं पाव चमचा
हळद पाव – अर्धा चमचा
हिंग चिमूटभर
कढीपत्ता ८–१० पानं
मीठ चवीनुसार
कृती
१. जाडे पोहे वापरत असाल तर पोहे चाळणीत धुवून पाणी निथळून टाका. १० मिनिटं ठेवा. बासमती पोहे वापरत असाल तर पोहे धुवू नका.
२. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा.
३. फोडणीत कांदा घाला. हळद घाला आणि २–३ मिनिटं परता.
४. बटाटे घाला. झाकण ठेवून २ मिनिटं मंद आचेवर वाफ काढा.
५. २ चिमूट मीठ घाला. झाकण ठेवून बटाटे शिजेपर्यंत शिजवा.
६. जाडे पोहे कढईत घाला. बासमती पोहे वापरत असाल तर कढईत १ कप पाणी घालून उकळी आणा आणि नंतर पोहे घाला. नीट मिक्स करा.
७. मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. मिक्स करा. झाकण ठेवून वाफ काढा.
८. पोहे सुके वाटत असतील तर थोडं पाणी शिंपडून वाफ काढा.
९. नारळ, कोथिंबीर घालून मिक्स करा.
१०. चविष्ट कांदे पोहे तयार आहेत.
११. गरमागरम पोहे नारळ, कोथिंबीर पेरून आणि एक लिंबाची फोड ठेवून खायला द्या.
टिप्स
१. कांदे पोहे सुके होऊ नयेत आणि फार ओले ही होऊ नयेत. ओले झाले तर गचका होतो. सुके दिसले तर थोडं पाणी शिंपडून वाफ काढा. ओले होऊ नयेत यासाठी पोहे धुतल्यावर पाणी निथळून टाका. आणि पातळ पोहे वापरू नका.
२. पोह्यात हळद जास्त झाली तर पोहे काळपट होतात. आणि कमी झाली तर पोहे पांढरट दिसतात. म्हणून हळद फोडणीत न घालता कांदा घातल्यावर घाला आणि तुमच्या हळदीच्या प्रमाणानुसार घाला.
कांदे पोह्याचे वेगवेगळे प्रकार
१. ह्या पोह्यात तुम्ही बटाटे न घालता फक्त कांदा घालू शकता. काही जणांच्या मते ते खरे कांदे पोहे. आणि वर लिहिलेल्या रेसिपी चे कांदे बटाटे पोहे.
२. ह्या पोह्यात कांदा न घालता फक्त बटाटे घालून बटाटे पोहे बनवू शकता.
३. कांदे आणि बटाटे दोन्ही न घालता फोडणीचे पोहे बनवू शकता.
४. तुमच्या आवडीच्या भाज्या ही घालू शकता – मटार, गाजर, फरसबी. भाज्या बारीक चिरून स्टेप ४ मध्ये फोडणीत घाला आणि शिजल्यावर पुढची कृती करा.
Your comments / feedback will help improve the recipes