Methichi Koshimbir (मेथीची कोशिंबीर) – Fenugreek Leaves Salad

Methichi Koshimbir (मेथीची कोशिंबीर) – Fenugreek Leaves Salad

Methichi Koshimbir (मेथीची कोशिंबीर) – Fenugreek Leaves Salad

मेथीची कोशिंबीर मराठी

This is an easy recipe to make tasty and healthy Koshimbir (Salad) using fresh Fenugreek Leaves. You may wonder how can one eat raw Fenugreek Leaves; it is so bitter! But this recipe makes this salad very tasty. Do try it out. And yes, don’t forget to wash Fenugreek leaves properly as we are not going to cook it.

Ingredients (Serves 2) (1 cup = 250 ml)

Finely chopped Fenugreek Leaves 2 cups

Crushed roasted Peanuts 2 tablespoon

Lemon Juice ½ teaspoon

Red Chilies 2

Sugar 1 teaspoon (adjust as per taste)

Salt to Taste

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder a pinch

Asafoetida 1 pinch

Instructions

1. Clean and Wash Fenugreek Leaves. Spread leaves on a kitchen napkins for drying.

2. Finely chop leaves and transfer to a bowl.

3. In a ladle heat oil on medium heat.

4. Add Mustard seed, wait for splutter; add Turmeric Powder, Asafoetida and slit red Chilies.

5. Pour this Tempering on chopped leaves and quickly cover the bowl. Leave it covered for 10 minutes.

6. Remove the lid. Add Crushed Peanuts, Sugar, Salt and Lemon Juice. Mix it.

7. Tasty and healthy Fenugreek Salad is ready. Serve as an accompaniment.

Note

1. You can chop Fenugreek leaves upfront. But it is recommended to make tempering and mix ingredients just before serving. Fenugreek leaves release water after adding Salt and Sugar.

Methichi Koshimbir (मेथीची कोशिंबीर)

Methichi Koshimbir (मेथीची कोशिंबीर) – Fenugreek Leaves Salad

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

मेथीची कोशिंबीर हिवाळा स्पेशल चविष्ट आणि पौष्टिक कोशिंबीर

ही मेथीच्या कच्च्या पानांची कोशिंबीर आहे. आश्चर्य वाटतंय? अजिबात कडू लागत नाही. खूप चविष्ट लागते. अगदी पटकन होणारी ही पौष्टिक कोशिंबीर नक्की करून बघा. आता हिवाळ्यात छान ताजी मेथी मिळायला लागलीय. छोट्या पानांची गावठी मेथी मिळाली तर ती जास्त छान लागते. मात्र मेथी चिरण्याआधी स्वच्छ निवडून आणि धुवून घ्या.

साहित्य (२ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )

बारीक चिरलेली मेथी २ कप

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट २ टेबलस्पून (कूट जरा जाडसर असू दे)

लिंबाचा रस अर्धा चमचा

साखर १ टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा)

लाल मिरच्या २

मीठ चवीनुसार

तेल १ टीस्पून

मोहरी पाव टीस्पून

हळद चिमूटभर

हिंग चिमूटभर

कृती

. मेथी निवडून स्वच्छ धुवून नॅपकिन वर पसरून ठेवा.

. मेथी बारीक चिरून एका वाडग्यात काढून घ्या.

. छोट्या कढईत तेल गरम करून मोहरी, हळद, हिंगाची फोडणी करून त्यात उभी चीर दिलेल्या लाल मिरच्या घाला.

. ही फोडणी मेथीवर ओता आणि लगेच झाकण ठेवून १० मिनिटं झाकून ठेवा.

. झाकण काढून मेथीत शेंगदाण्याचं कूट, साखर, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिक्स करा.

. मेथीची चविष्ट कोशिंबीर तयार आहे. तोंडीलावणं म्हणून खायला द्या. ही कोशिंबीर सॅलड म्हणून खायला ही छान लागते.

टीप

. मेथीची पानं तुम्ही आधी चिरून ठेवू शकता. पण फोडणी आणि बाकी साहित्य वाढायच्या वेळेला मिक्स करा. कारण मीठ, साखरेमुळे मेथीला पाणी सुटतं.

Methichi Koshimbir (मेथीची कोशिंबीर)

Methichi Koshimbir (मेथीची कोशिंबीर) – Fenugreek Leaves Salad

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes