Navalkol Bhaaji (नवलकोल / अल्कोल भाजी) – German Turnip Subji

Navalkol Bhaaji (नवलकोल / अल्कोल भाजी) – Germen Turnip Subji

Navalkol Bhaaji (नवलकोल / अल्कोल भाजी) – German Turnip Subji – No Onion Garlic Recipe

नवलकोल/अल्कोल भाजी मराठी

Navalkol is Alkol or Knolkol or Gathgobi or Kohlrabi or German Turnip. It tastes somewhat like cabbage but has little strong flavour. In India, you get it in winter. It is generally sold by vendors who sells green vegetables. This is an easy recipe that makes tasty subji. My mother used to scrap the Navalkol (like coconut) for making this subji. But I use grated Navalkol. This is No onion / Garlic subji. Same recipe is used to make Cabbage subji also.

Ingredients (Serves 4)

Navalkol – German Turnip (नवलकोल / अल्कोल )

Navalkol / German Turnip 3 medium bulbs

Split Bengal Gram (Chana Daal) 2 tablespoon

Green Chilies Paste 1 teaspoon

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Chopped Coriander 1 tablespoon

Sugar ½ teaspoon (Adjust as per taste)

Lemon Juice ½ teaspoon

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Salt to taste

Instructions

1. Wash and Soak Split Bengal Gram (Chana Daal) in water for 6 hours.

2. Remove the leaves of Navalkol. Wash, Peel and grate Navalkol using a thick grater.

Grated Navalkol / German Turnip (किसलेला नवलकोल)

3. Heat oil in a pan on medium flame.

4. Add Mustard Seeds, wait for sputter; add Cumin Seeds, wait for splutter.

5. Add Turmeric Powder, Asafoetida, Green chilly paste.

6. Add grated Navalkol and Chana daal. Mix.

7. Cook covered for 3 minutes on low flame without adding water.

8. Remove the lid, add water to cover half the mixture and cook covered till Navalkol and Chana Daal are cooked. Keep stirring in between; add water as required.

9. Add Salt, Sugar, Lemon Juice, Scraped Coconut, Chopped Coriander and bring to boil.

10. There should not be much water in the Bhaaji. If there is, then cook further without lid till you get required consistency.

11. Serve hot with roti (Indian Bread) or rice.

Navalkol Bhaaji (नवलकोल / अल्कोल भाजी) – Germen Turnip Subji

===================================================================================

नवलकोल / अल्कोल भाजी – कांदा लसूण विरहित चविष्ट भाजी

हिवाळ्यात नवलकोल / अल्कोल छान कोवळे मिळतात. ह्याची चव कोबीसारखी पण जरा उग्र असते. नवलकोलची चणा डाळ घालून भाजी छान होते. माझी आई ही भाजी करताना नवलकोलचे दोन तुकडे करून नारळासारखं खरवडून घ्यायची. मी मात्र नवलकोल जाड किसणीवर किसून भाजी करते. ह्या भाजीत कांदा लसूण नाही. हीच रेसिपी वापरून कोबीची भाजी ही करता येते.

साहित्य (४ जणांसाठी)

Navalkol – German Turnip (नवलकोल / अल्कोल )

नवलकोल ३ मध्यम आकाराचे कांदे

चणा डाळ २ टेबलस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

साखर अर्धा टीस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा )

लिंबाचा रस अर्धा टीस्पून

तेल १ टीस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हळद पाव टीस्पून

हिंग १ चिमूट

मीठ चवीनुसार

कृती

. चणा डाळ धुवून ६ तास पाण्यात भिजवून ठेवा

. नवलकोलची पानं काढून टाका. नवलकोल धुवून, सालं काढून जाड किसणीवर किसून घ्या.

Grated Navalkol / German Turnip (किसलेला नवलकोल)

. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद, हिंग घालून फोडणी करा. फोडणीत हिरवी मिरची घाला.

. किसलेला नवलकोल आणि चणा डाळ घाला. पाणी घालू नका. मिक्स करून झाकण ठेवून ३ मिनिटं वाफ काढा.

. भाजी अर्धी बुडेल एवढं पाणी घाला. झाकण ठेवून नवलकोल आणि चणा डाळ मऊ होईपर्यंत शिजवा. मधे मधे ढवळा. जरूर पडेल तर थोडं पाणी घाला.

. भाजीत मीठ, साखर, नारळ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घाला. ढवळा आणि एक उकळी आणा.

. ह्या भाजीला जास्त रस नसतो. भाजीत जास्त पाणी दिसत असेल तर मध्यम गॅसवर झाकण न ठेवता भाजी उकळा. हवी तेव्हढी दाट झाली की गॅस बंद करा.

. टेस्टी नवलकोल भाजी तयार आहे. गरमागरम भाजी पोळी / भातासोबत खायला द्या.

Navalkol Bhaaji (नवलकोल / अल्कोल भाजी) – Germen Turnip Subji

 

2 Comments

Leave a Reply to sudha Cancel reply