Caramelized Carrot Soup (कॅरॅमलाईझ्ड गाजराचे सूप)
Carrot , Honey and Cinnamon combination tastes super yuumy. I make a soup using these ingredients. It’s a delicious soup. It’s a very easy recipe to make a healthy soup that tastes different than normal soup. It requires very few ingredients. Try it out.
Ingredients (Serves 4)
Carrots 3 medium size
Ghee (Clarified Butter) ½ teaspoon
Sugar 1 to 1.5 teaspoon
Honey 1 teaspoon (or as per taste)
Cinnamon Powder ¼ teaspoon
Lemon Juice ¼ to ½ teaspoon
Salt to taste
Black Pepper powder as per taste (optional; I did not add it)
Almonds for garnishing
Instructions
1. Peel Carrots and make 3 inch long pieces. If you have thick/fat carrots, cut them into 2 or 4 pieces lengthwise. Else leave as cylindrical pieces.
2. Heat a Griddle. Apply some Ghee and place carrot pieces on the Griddle as a single layer. Sprinkle sugar over the pieces. Roast on low flame till carrots are caramelized on both sides.
3. Leave carrots to cool. Upon cooling, blend into a smooth paste. Add Water if required.
4. Transfer the paste a pan. Add water to adjust consistency.
5. Bring the mixture to boil. Add salt, Cinnamon powder, Honey and Lemon Juice. You can add Black pepper powder if you want little spicy taste else the taste of cinnamon is good enough.
6. Switch off the gas after 2 minutes. Delicious soup is ready.
7. Garnish it with almond pieces and serve hot.
==================================================================================
कॅरॅमलाईझ्ड गाजराचे सूप
गाजर, मध आणि दालचिनी हे एक स्वादिष्ट कॉम्बिनेशन आहे. हे जिन्नस वापरून मी सूप बनवते. अगदी स्वादिष्ट सूप बनतं. हे पौष्टिक आणि जरा वेगळ्या चवीचं सूप बनवण्याची रेसिपी सोपी आहे. नक्की करून बघा.
साहित्य (४ जणांसाठी)
गाजरं ३ मध्यम
तूप अर्धा चमचा
साखर एक–दीड चमचा
मध १ चमचा (चवीनुसार कमी /जास्त करा)
दालचिनी पूड पाव चमचा
लिंबाचा रस पाव ते अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
काळी मिरी पूड चवीनुसार (ऐच्छिक)
बदामाचे काप सजावटीसाठी
कृती
१. गाजरं सोलून त्याचे ३ इंच लांबीचे तुकडे करून घ्या. गाजर जाड असेल तर ह्या तुकड्यांचे २ किंवा ४ तुकडे करा.
२. एक तवा गरम करून त्यावर थोडं तूप लावा. त्यावर गाजराचे तुकडे पसरून ठेवा. एकच थर लावा. वरून थोडी साखर पेरा.
३. मंद आचेवर गाजर दोन्ही बाजूंनी कॅरॅमलाईझ होईपर्यंत भाजून घ्या.
४. तुकडे ताटलीत काढून गार करा.
५. गार झाल्यावर मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घ्या. जरूर असल्यास थोडं पाणी घाला.
६. गाजराची पेस्ट एका पातेल्यात काढून घ्या आणि मंद आचेवर एक उकळी काढा.
७. त्यात मीठ, मध, लिंबाचा रस आणि दालचिनी पूड घाला. हवी असल्यास मिरी पूड घाला. २ मिनिटं उकळा.
८. स्वादिष्ट सूप तयार आहे. गरम सूप बदामाचे काप घालून सर्व्ह करा.
Your comments / feedback will help improve the recipes