Methi Dhebra (मेथी ढेब्रा)– Fenugreek Roti – Gujarati Specialty

Methi Dhebra (मेथी ढेब्रा)

Methi Dhebra (मेथी ढेब्रा)– Fenugreek Roti – Gujarati Specialty

मेथी ढेब्रा मराठी

Dhebra is a Gujarati Snack like Thepla but not so popular like Thepla. I was not sure about the difference between Thepla and Dhebra. As per my Gujarati friend, in Dhebra, Bajri Flour (Pearl Millet) and wheat flour is added together; whereas in Thepla there is only wheat flour. Also Jaggery water in Dhebra instead of sugar that is added to Thepla. My friend told me the ingredients of Methi Dhebra. I used my judgment for measures. Dhebras turned out to be soft and yummy. This is healthier than Thepla.

You can make Dhebra using Spring Onions, Dudhi (bottle gourd / Lauki), Radish Greens (Muli Leaves) or Carrots.

Ingredients (For 12-13 Dhebra) (1 cup = 250 ml)

Chopped Methi Leaves (Fresh Fenugreek) 2 cups

Bajri (Pearl Millet) Flour 1 cup

Wheat Flour 2 cup (or as required)

Garlic crushed 6-7 cloves (Instead you can use crushed green garlic)

Curd 2 tablespoon

Sesame Seeds 1 tablespoon

Carom Seeds (Ajwain) ½ teaspoon

Green Chilly Paste ½ teaspoon

Chilly Powder ½ teaspoon

Crushed Jaggery / Jaggery powder 1 to 1.5 tablespoon (as per taste)

Fresh Cream (Malai) 1 tablespoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida a pinch

Salt to taste

Oil 2 tablespoon + for roasting Dhebra

Instructions

1. If you are using crushed jaggery, dissolve jaggery in 1 to 2 tablespoon of water. Do not add more water. If you are using Jaggery powder, no need to dissolve in water.

2. In a bowl, mix all ingredients except jaggery water.

3. If you are using Jaggery powder, add it to these ingredients.

4. Mix everything together. The mixture will be moist due to curd, oil, Methi (Fenugreek), Fresh Cream. Add little Jaggery water / plain water as a time and start binding the dough together. Keep adding little jaggery water / plain water at a time. The dough should be stiff.

5. Keep the dough for 10 minutes. If you keep it longer, dough will start becoming very soft and it will become difficult to roll Dhebra.

6. Roll little thick circular Dhebras (like Theplas). Use wheat flour for dusting if required.

7. Roast Dhebras on a hot Griddle using little oil. Roast both sides.

8. Serve hot with chutney of your choice or curd or butter.

Methi Dhebra (मेथी ढेब्रा)
Methi Dhebra (मेथी ढेब्रा)

===================================================================================

मेथी ढेब्रा गुजराती स्नॅक

ढेब्रा हा ठेपला सारखा एक गुजराती पदार्थ आहे पण ठेपल्याएवढा लोकप्रिय नाही. माझ्या गुजराती मैत्रिणीनं सांगितल्याप्रमाणे ढेब्रा बनवताना बाजरीचं आणि गव्हाचं पीठ वापरतात. आणि साखरेऐवजी गुळाचं पाणी वापरतात. ठेपल्यापेक्षा पौष्टिक असतात ढेब्रा. मी मेथीचे आणि दुधी भोपळ्याचे ढेब्रे केलेत. खूप छान, चविष्ट आणि नरम होतात हे. ही रेसिपी मेथी ढेब्रा ची आहे.

तुम्ही असेच दुधी भोपळा, गाजर, कांद्याची पात, मुळ्याचा पाला घालून ढेब्रे करु शकता

साहित्य (१२१३ ढेब्रा साठी) (१ कप = २५० मिली )

चिरलेली मेथी २ कप

बाजरी पीठ १ कप

कणिक २ कप (लागलं तर थोडं जास्त)

ठेचलेली लसूण ६७ पाकळ्या (तुम्ही हिरवी लसूण ही वापरू शकता )

दही २ टेबलस्पून

तीळ १ टेबलस्पून

ओवा अर्धा टीस्पून

ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून

लाल तिखट अर्धा टीस्पून

चिरलेला गूळ किंवा गुळाची पावडर १ ते दीड टेबलस्पून

साय १ टेबलस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग चिमूटभर

मीठ चवीनुसार 

तेल २ टेबलस्पून आणि ढेब्रा भाजायला

कृती

. चिरलेला गूळ वापरत असाल तर १ २ टेबलस्पून पाण्यात गूळ भिजत घाला. जास्त पाणी घालू नकागुळाची पावडर वापरत असाल तर भिजवायची गरज नाही.

. एका परातीत गुळाची पावडर सोडून सगळे जिन्नस एकत्र करा आणि छान मिक्स करा. गुळाची पावडर वापरत असाल तर ती पण घाला.

. आता थोडं थोडं गुळाचं पाणी ( साधं पाणी जर गुळाची पावडर घातली असेल तर) घालून घट्ट पीठ भिजवा. जरूर असेल तर साधं पाणी घाला.

. १० मिनिटं पीठ झाकून ठेवा.

. पिठाचे मोठ्या लिंबाएवढे गोळे करून जरा जाडसर ढेब्रे लाटा. आणि गरम तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्या. भाजताना थोडं तेल घालाचविष्ट ढेब्रे तयार आहेत

. गरम ढेब्रे चटणी आणि दही किंवा लोण्यासोबत खायला द्या

Methi Dhebra (मेथी ढेब्रा)
Methi Dhebra (मेथी ढेब्रा)

2 Comments

  1. हॅलो मॅडम, ही रेसिपी मी काल करुन बघितली, अतिशय स्वादिष्ट लुसलुशीत ढेब्रा झाले होते. आता हे खाल्ल्यावर मेथी पराठे नको वाटतात.\nमी काल फक्त मिरची नव्हती घातली, लाल तिखट घातले होते जास्त. एवढी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

Your comments / feedback will help improve the recipes